
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील महत्वाचा सहकारी साखर कारखाना श्री आदिनाथ सह.साखर कारखान्याची सरफेसी ॲक्ट-२००२ अंतर्गत जप्ती नंतर ची लिलाव प्रक्रीया होत असुन. एनसीडीसीने कारखान्याचा ताबा कायदेशिरणे घेतलेला आहे. सरफेसी कायद्यातील तरतुदी पाहता कर्जदार किंवा कर्जदार संस्थेने एखाद्या वित्तिय संस्थेचे कर्ज वेळेत अदा केले नसल्यास आणि या कामी कर्जदार संस्था कोणतेही स्वारस्य दाखवत नसल्यास परिणामी वित्तिय पुरवठा केलेल्या बँकेला परिणामी नोटीस

पाठवुन त्याबाबतच्या सर्व कायदेशिर प्रक्रिया पुर्ण करून जप्ती प्रक्रिया करावी लागते व त्यानंतर मालमत्तेचा लिलाव केला जातो. आदिनाथ साखर कारखान्याची सत्ता येण्यापूर्वी आणि आल्यानंतर शेतकरी, सभासद आणि कामगारांना दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करण्याऐवजी नेहमीच वेगळ्याच विषयाची चर्चा घडवून चर्चेत राहणारे ज्योतिष विशारद पाटील गटाचे प्रवक्ते तळेकर नेहमीच भविष्य काळात घडणाऱ्या गोष्टींविषयी नेहमीच भाकीत करतात. वास्तविक तालुक्यातील महत्वाचे आमदारपद पाटील गटाकडे आहे. परंतु दिड दोन वर्षात विकासकामांसाठी कसलाही निधी मंजूर झालेला नाही. त्यातच

तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा असणाऱ्या आदिनाथ कारखान्याची सत्ता पाटील गटाकडे आहे. परंतु आदिनाथ कारखाना चालु करण्यात अपयशी ठरले आहेत. त्यातच एनसीडीसीने जप्ती करून कारखान्याच्या मालमत्तेची विक्री (लिलाव) करणेबाबतची नोटीस जारी केलेली असुन यापुर्वी दोन वेळा मुदत देऊनही विद्यमान चेअरमन व संचालक मंडळांने कर्जाचे परतफेडी बाबत कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाही. त्यामुळेच सरफेसी ॲक्टप्रमाणे जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेची विक्री लिलाव प्रक्रियेतून होताना दिसत आहे. लिलाव प्रक्रिया राबवुन कारखाना खाजगी कंपनीच्या घशात घालण्याची शक्यता नाकारता येत नाही. वस्तुतः बारामती ॲग्रो कारखान्याला भाडेपट्टा करिता विरोध करणारे लोकच आपला कारखाना खाजगी कंपनीच्या घशात घालण्याच्या तयारीला लागलेले आहेत. सदरची कायदेशिर प्रक्रिया होईपर्यंत आणि लिलावाची परत शक्यता येईपर्यंत सत्ताधारी मंडळी निद्रीस्त कसे ? याचे उत्तर खरे तर पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी देणे गरजेचे वाटते. आमचे नेते माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा म्हैसगावचा कारखाना हा स्वतःचा खाजगी होता, तो मुळीच आदिनाथ प्रमाणे सहकारी नव्हता त्यामुळे आदिनाथ रूपी सहकाराचे मंदिर कसे वाचवणार याबाबत व तालुक्याच्या विकासकामांबाबत बोलण्याऐवजी प्रवक्ते तळेकर जाणिवपूर्वक जगताप गट संपला, बागल गट, शिंदे गट संपणार अशी काही भाकीते करून जनतेचे नेहमीच मनोरंजन करतात. रिटेवाडी उपसा सिंचन योजनेचे नाव बदलून योजनेला नवीन नाव देऊन योजना होऊ देत नाही हे त्यांचे वक्तव्ये बालिशपणाचे असुन रिटेवाडी उपसा सिंचन राबवायचीच असेल तर त्यासाठी धरणात पाणी शिल्लक असणे आवश्यक आहे. धरणातील सर्व पाण्याचे वाटप पुर्वीच ठरले असल्यामुळे नवीन योजनेला मंजुरी देणे शासनाला शक्य नाही. म्हणूनच माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी अभ्यासपूर्ण मांडणी करून वरून कुकडीचे आपल्याकडे येणारे पाण्याचा अपव्यय जवळपास ८ ते १० टिएमसी होतो. ते सर्व अपव्यय होणारे पाणी उजनी धरणात आणायचे व उजनीत आलेल्या पाण्यावर दोन उपसासिंचन योजना राबवुन केत्तुर येथून चिलवडी चारी पर्यंत आणि वाशिंबे-रिटेवाडी येथून पोंधवडी चारिपर्यंत पाणी न्यायचे व करमाळ्याचे उर्वरीत क्षेत्र बागायती करायचे स्वप्न उराशी बाळगले व पत्रव्यवहार केला परंतु जनतेची फक्त दिशाभुल करायची, कोणत्याही गोष्टीचा अभ्यास न करता वक्तव्ये करायची एवढेच धोरण प्रवक्ते तळेकर यांचे दिसते. प्रवक्ते तळेकर करमाळा तालुक्यातील महत्वाच्या प्रकल्पाची किंवा विकासकामांची माहिती कधीही जनतेला देत नाहीत. स्वतःचे अपयश झाकण्यासाठी ज्योतिषा प्रमाणे भाकीत करताना दिसतात. त्यामुळे प्रवक्ते तळेकर यांनी आदिनाथ कसा वाचवणार याबाबत व करमाळा तालुक्यातील विकास कामांबाबत भाष्य करावे. असे मत करमाळा पंचायत समितीचे उपसभापती व माजी आमदार संजयमामा शिंदे गटाचे प्रवक्ते ऍड. अजित विघ्ने यांनी केले आहे.