
करमाळा प्रतिनिधी
दिनांक 07- 04-2026 रोजी (वार-मंगळवार) ज्ञानप्रबोधिनी मतिमंद मुलांची शाळा, कोर्टी येथे जेवण देण्यात आले. दिनांक 08-04 2026 (वार-बुधवार) कुटीर रुग्णालय येथे फळे वाटप करण्यात आली. मूकबधिर शाळा देवीचे माळ येथे जेवण देण्यात आले. दिनांक 09-04-2026 (वार- गुरुवार) या दिवशी श्रीराम प्रतिष्ठान येथे जेवण देण्यात आले. दिनांक 10-04-2026 रोजी (वार- शुक्रवार) गोशाळा चारा वाटप केला. आज 11-04-2026 (वार-शनिवार) या दिवशी स्मारकास अभिवादन करून भव्य

रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. सर्वांनी रक्तदान करून देशाचे नागरिक म्हणून कर्तव्य पार पाडावे. महात्मा जोतीराव फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्व क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी करमाळा तालुका व शहर वरील उपक्रम राबवले. सुनील बनसुडे- (नगरसेवक- क.न.प.करमाळा) यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रम घेण्यात आले. वरील उपक्रमामुळे करमाळा शहरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. महात्मा फुलेंनी शेवटच्या श्वासापर्यंत सामाजिक व शैक्षणिक कार्य केले. याबद्दलची कृतज्ञता म्हणून त्यांची जयंती सुद्धा अन्नदान, चारा वाटप व फळे वाटप करून साजरी होणे ही बाब कौतुकास्पद आहे. यामुळे करमाळा शहर व तालुका यामधील समस्त नागरिक क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे कौतुक करत आहेत.
