करमाळा प्रतिनिधी

समाजातील अन्याय, अत्याचार आणि प्रशासकीय भ्रष्टाचाराविरोधात नेहमीच डरकाळी फोडणारे करमाळा तालुक्यातील वांगी येथील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते गणेश भानवसे यांची भारतीय भ्रष्टाचार निवारण समिती’च्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. निती आयोग प्रमाणित असलेल्या या अत्यंत महत्त्वाच्या संस्थेच्या निवडीमुळे सोलापूर जिल्ह्यातील भ्रष्ट कारभाराचे धाबे दणाणले आहेत.

गणेश भानवसे यांनी आजवर विविध राजकीय पक्ष आणि ‘जनशक्ती संघटनेच्या’ माध्यमातून सर्वसामान्यांच्या हक्कासाठी मोठा लढा दिला आहे. गोरगरीब जनतेवर होणारा अन्याय असो किंवा प्रशासनातील लालफितीचा कारभार, भानवसे यांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेऊन सामान्यांना न्याय मिळवून दिला आहे. आता त्यांच्या खांद्यावर भारतीय भ्रष्टाचार निवारण समि तीच्या जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याने, त्यांच्या सामाजिक कार्याला अधिकृततेचे बळ मिळाले आहे.

या निवडीनंतर सोलापूर जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जिल्ह्याच्या शासन प्रशासनातील वाढता भ्रष्टाचार आणि सामान्यांची होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी आता एक अधिकृत आणि आक्रमक व्यासपीठ भानवसे यांच्या रूपाने उपलब्ध झाले आहे.

भानवसे यांच्या निवडीमुळे करमाळा तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण आहे. त्यांच्या निवडीमुळे खऱ्या अर्थाने ‘दक्ष’ कार्यकर्त्याला न्याय मिळाला असून, आगामी काळात जिल्ह्यातील भ्रष्ट कारभाराला चाप बसेल, अशी खात्री जनतेतून व्यक्त केली जात आहे.

…………………

आजवर जनशक्तीच्या माध्यमातून मी रस्त्यावर उतरून लढा दिला आहे. आता या नव्या जबाबदारीमुळे जिल्हयातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर आणि व्यवस्थेवर अंकुश ठेवणे सोपे होईल. सर्वसामान्यांच्या अन्यायाविरुद्धचा माझा लढा यापुढे अधिक तीव्र होईल – गणेश भानवसे नवनियुक्त जिल्हा उपाध्यक्ष, भारतीय भ्रष्टाचार निवारण समिती

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *