स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा
स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल मध्ये सकाळी सचिव/मुख्याध्यापिका धनश्री जयंत दळवी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष/संस्थापक जयंत रामचंद्र दळवी उपस्थित होते.
त्यांच्या हस्ते भारतमाता,महात्मा गांधी, डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले होते. यावेळी
शिक्षक सीमा कोरडे, हेमा शिंदे, शिवांगी कांबळे, कोमल बत्तीसे, पल्लवी माळवे, शुभांगी खळदकर,अंजुम कांबळे, फरहाणा खान, सविता पवार, रोहिणी गरड,श्रद्धा गांधी,कृष्णा पवार, राहुल पलंगे,बाबा तांबोळी,अंकुश नाळे हे उपस्थित होते. मनोगत शुभम चव्हाण, रुद्र चव्हाण,कार्तिक कोरडे, आराध्या कांबळे, हर्षदा बनकर, आदित्य झाडबुके, अमोदिनी सांगडे, अद्विता झालटे, साजिरी कोळी या मुलांनी केले व सूत्रसंचालन सीमा कोरडे यांनी केले. नंतर शेवटी मुलांना बिस्कीट व चॉकलेट देऊन कार्यक्रम संपन्न.