करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यामध्ये महावितरण कंपनीने रात्री 10 ते पहाटे 6 वाजेपर्यंत कृषी पंपांना विज देण्याचा घाट घातला आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कृषी पंपाची दिवसा लाईट दिली जाईल असे परिपत्रक काढले होते परंतु करमाळा तालुक्यातील महावितरणचे कलावते मनमानीकरुन शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळत आहेत. रात्री 10 ते पहाटे 6 वाजेपर्यंत शेतकऱ्यांनी दिवसभर शेतामध्ये राबवून रात्री लाईट आल्यानंतर रात्रभर पिकांना उभा राहून पाणी द्यावे लागत आहे. रात्रीच्या वेळी हिंसप्राणी, सर्पदंश, विंचू, विजेचा अपघात होऊन अनेक शेतकरी गत प्राण झालेले आहेत. महावितरण

कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी रात्रीच्या वेळी काम करून दाखवावे अशी शेतकऱ्यांतून संतापाची लाट तयार झाली आहे. महाराष्ट्र शासनाने 31/12/2025 रोजी परिपत्रक काढून शेतकऱ्यांना दिवसा लाईट द्यावी असा जीआर काढला आहे परंतु ह्या मनमानी करणाऱ्या कलावते नामक अधिकाऱ्याने शेतकऱ्यांच्या जीवनाशी खेळ खेळण्याचे व मुख्यमंत्र्यांच्या जीआरला केराची टोपली दाखवली आहे. करमाळा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना कृषी पंपाची लाईट दिवसा न दिल्यास भाजप किसान मोर्चाच्या वतीने करमाळा महावितरण कंपनीचे ऑफिस समोर ठिय्या आंदोलन केले जाईल असा इशारा भाजप किसान मोर्चाचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस अण्णासाहेब सुपनवर यांनी दिला. यावेळी अनेक शेतकरी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *