करमाळा प्रतिनिधी

रमजान ईदची नमाजपठण करमाळा शहरातील मौलाली माळ येथील ईदगाह मैदानावर ठीक सकाळी 08:15 वाजता होईल अशी माहिती करमाळा शहरातील शहर काझी हाजी कलीम काझी सर यांनी सांगितले असुन शहर व तालुक्यातील समाज बांधवांनी रमजान ईदची नमाजपठाण अदा करण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.

समाज बांधवांनी ईदची नमाजपठण झाल्यानंतर शांततामय वातावरणात भक्तीमय भावनेने भारतातील एकता व अखंडता आणि बंधुभाव टिकण्यासाठी अल्लाह चरणी प्रार्थना करावी. एकमेकांबद्दल असणारा व्देष, मत्सर कटुता आणि स्वैराचार दुर करण्यासाठी सर्व धर्मातील लोकांनी मनापासून प्रयत्न करावे. जगामध्ये भारत हाच एक असा देश आहे की विविध धर्मातील लोक एकमेकांचा आदर करत आपली जीवनशैली जगत आहे व हीच अखंडता आणि बंधुभाव टिकवून ठेवण्याची जबाबदारी आज प्रत्येक भारतीय नागरीकावर आहे.

आज असणाऱ्या हिंदू नववर्ष गुढी पाडव्याच्या निमित्ताने समस्त हिंदू बांधवांना शुभेच्छा देत आहोत. सर्वांना नवीन वर्ष हे सुख समृद्धी आणि भरभराटीचे जावो यंदा पाऊस पाणी भरपूर पडुन अन्न धान्याने, शेती मालाला भाव मिळुन बळी राजाला सुखाचे दिवस यावे.

रमजान ईदच्या दिवशी मुस्लीम बांधवांनी हिंदू बांधवांना आपल्या घरी बोलावून शिरखुर्माचा आस्वाद देऊन आम्ही एक आहे आणि एकच राहणार असा “एक ही हिंदुस्थान एक ही दस्तरखान” असा संदेश सर्व भारतात पोहोचविणे गरजेचे आहे.

समाजातील एखाद्या विघ्न संतोषी लोकांनी दोन्ही समाजामध्ये कटुता आणि वैरत्व येईल असे कोण कृत्ये करीत असेल किंवा तसा प्रयत्न करत करत असेल तर आम्ही या लोकांचा निषेध व्यक्त करुन त्यांच्या या कृत्याला समाज साथ देणार नाही उलट त्याला योग्य ते शासन होण्यासाठी आम्ही सर्व समाजातील लोक पुढे येऊ अशी ग्वाही दिली  आहे. प्रशासनास सहकार्य करावे व मोठ्या भक्तिभावाने ईदचा सण साजरा करावा असे आवाहन सर्व मुस्लीम समाज बांधवांना शहर काझी कलीम काझी सर यांनी केले आहे.

यावेळी समीर शेख,  जमीर सय्यद,  मुस्तकीम पठाण, सुरज शेख, रमजान बेग,  जहांगीर बेग,  इकबाल शेख, इमित्याज पठाण, आझाद शेख,फिरोज बेग, कलंदर शेख, जावेद सय्यद, शाहीद बेग, अलिम पठाण, अरबाज बेग, कलीम शेख, दिशान कबीर, खलील कुरेशी, सुपरान शेख, शाहरुख शेख, गुलाम सय्यद, कय्युम मदारी, अक्रम मदारी, दाऊद मदारी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *