करमाळा प्रतिनिधी

मागील २-३ महिन्यांपासून महावितरण प्रशासनाकडून नाहक त्रास तालुक्यातील शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे, या विरोधात महावितरण बार्शीचे कार्यकारी अभियंता राकेश मगर यांना भारतीय जनता पार्टी व माढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा व आठ तास पूर्ण क्षमतेने थ्री फेज वीजपुरवठा करण्यात यावा. यासह अन्य मागण्यांच्या संदर्भात निवेदन दिले. महावितरण कंपनीचा मनमानी कारभार खपवून घेतला जाणार नाही.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना वीज मोफत दिली आहे. महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांच्या बिलाचे एक रक्कमी पैसे महावितरण कंपनीला देत आहे. तरी देखील शेतकऱ्यांना सुरूळीत वीज पुरवठा होत नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांवर अन्याय होत होता, सक्तीची वीज बिल वसुली केली जात होती, विद्युत ट्रान्सफार्मर सोडवले जात होते, त्याविरोधात आंदोलने करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला होता. मात्र आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने शेतकऱ्यांना मोफत वीज दिली आहे आणि शेतकऱ्यांच्या बिलाचे पैसे महावितरणला देत आहे असे असताना देखील महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे महायुती सरकारला बदनामी सहन करावी लागत आहे.

तातडीने उपाययोजना करून माढा तालुक्यातील शेतकऱ्यांना पूर्णवेळ उच्च दाबाने वीजपुरवठा द्यावा. अन्यथा बार्शी येथील महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा भारतीय जनता पार्टी माढा तालुका व शेतकऱ्यांच्या वतीने दिला.

यावेळी केलेल्या मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास पडसाळी, भुताष्टे, चिंचोली, लऊळ, उजनी व परिसरातील नागरिकांच्या वतीने महावितरण प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा गर्भित इशारा देखील दिला.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष तथा पडसाळीचे सरपंच योगेश पाटील, माजी सरपंच दत्ता नाना फरड, तंटामुक्ती अध्यक्ष महेश पाटील, तात्यासाहेब फरड, प्रवीण पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य भिकाजी थोरात, अनुरथ पाटील, सिद्धेश्वर देशमुख, सुनील देशमुख, गोल्डन देशमुख, पंकज मगर उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *