करमाळा प्रतिनिधी

महिलांसाठी २४ वर्षाची परंपरा असलेल्या या व्यासपीठावर आयोजित प्रत्येक स्पर्धेत मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन महोत्सवाची भव्यता वाढवावी असे आवाहन ज्योतीताई नारायण पाटील यांनी महिलांना केले. आजपासून जेऊरमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त ‘महिला महोत्सव सुरु झाला असुन‌ आमदार नारायण आबा पाटील यांच्या सुविद्य पत्नी ज्योतीताई पाटील यांच्या हस्ते आज या महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दरवर्षी जेऊर ता. करमाळा येथे महिला महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाच्या या महोत्सवातील कार्यक्रमाबाबत अधिक

माहिती देताना जोतीताई पाटील यांनी सांगितले की, आमदार नारायण आबा पाटील मित्रमंडळ व ग्रामपंचायत जेऊर यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी महिला दिन साजरा केला जातो. यंदाचे हे २४ वे वर्ष असुन गेली २३ वर्षे महिला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यंदा १७ मार्च ते २२ मार्च या दरम्यान महिला भगिनींसाठी विविध स्पर्धात्मक कार्यक्रम आयोजित केले आहेत. मंगळवार दिनांक १७ मार्च रोजी रांगोळी, वक्तृत्व व उखाणे स्पर्धा घेण्यात येणार आहे तर बुधवारी दि. १८ मार्च रोजी अभिनय स्पर्धा तसेच फॅशन शो आयोजित केला गेला आहे. शुक्रवारी दि २० मार्च रोजी फनी गेम्स, रिल स्पर्धा व

व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तसेच दिनांक २१ मार्च शनिवारी पाककला व अंताक्षरी स्पर्धा होणार आहेत. तसेच या दिवशी जेऊर मधील महिलांच्या सुरेल गायनाचा गीत सादरीकरण कार्यक्रम होणार आहे. यात मराठी व हिंदी भावगीते आणि चित्रपट गीतांचा समावेश आहे. संगिताची साथ संगीत विशारद खंडागळे बंधू यांची असणार आहे. तर दिनांक २२ मार्च रविवार रोजी महिलांच्या नृत्य स्पर्धा व बक्षिस वितरणाचा सोहळा पार पडणार आहे. यंदाच्या वर्षी आदर्श महिला शेतकरी व आदर्श उद्योजक महिला या दोन पुरस्कारांनी महिलांचा सन्मान केला जाणार असल्याचे सांगून या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन ज्योतीताई पाटील यांनी केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *