करमाळा प्रतिनिधी

सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झिंजाडे यांनी आज “युद्ध नको – शांतता हवी” या संदेशासह १ जून आंतरराष्ट्रीय शांतिदूत दिवस साजरा करण्याचा जागतिक उपक्रम जाहीर केला आहे. या उपक्रमामध्ये जगभरातील शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन शांततेचा संदेश देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या संदर्भात संयुक्त राष्ट्र संघ तसेच विविध आंतरराष्ट्रीय संस्था, राष्ट्रीय मानव अधिकार आयोग आणि राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग, नवी दिल्ली यांना अधिकृत निवेदन पाठविण्यात आले असून त्यासोबत “युद्ध नको – शांतता हवी” असा संदेश असलेल्या ध्वजाचा नमुना देखील पाठविण्यात आला आहे.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी १ जून रोजी शांततेची शपथ घेणे, शाळांमध्ये शांततेचा ध्वज फडकविणे आणि समाजात अहिंसा व मानवतेचा संदेश देणे असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक नागरिकाने आपल्या वाढदिवशी घरामध्ये छोटासा शांततेचा ध्वज ठेवून वाढदिवस साजरा करावा, जेणेकरून दररोज जगात शांततेचा संदेश दिला जाईल, अशी संकल्पना मांडण्यात आली आहे.

या माध्यमातून जगभरातील विद्यार्थ्यांनी शांततेचे दूत बनून युद्धमुक्त जगाच्या निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्रमोद झिंजाडे यांनी केले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *