करमाळा प्रतिनिधी

बोराटवाडी ता. मान जि.सातारा येथे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करमाळा तालुक्यातील आवाटी, मांजरगाव, राजुरी येथील कार्यकर्त्यांचा प्रा.रामदास झोळ सर यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला. यामध्ये आवाटी गावचे बाबू मुलानी, रफिक खान, मुजीब पटेल, कदिर पटेल, सोहेल पठाण, अनिस सय्यद तसेच मांजरगाव येथील कल्याण मोरे (माजी सरपंच), रामहरी मोरे, किशोर मोरे,सचिन

पाटील,सोमनाथ गरदडे, प्रभाकर मोरे तसेच राजुरी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश जाधव, जालिंदर पाटील इत्यादींनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेशावेळी दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाजपा नेते प्रा.रामदास झोळ सर, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक नवनाथ बापू झोळ, शेलगावचे माजी सरपंच रायचंद खाडे, गणेश जाधव, महावीर एकाड, बापू वाडेकर, संदीप सरडे, गोपीनाथ पाटील, संजय जगताप, ज्ञानेश्वर शिंदे, हर्षद आढाव, आदीजण उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *