करमाळा प्रतिनिधी

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये करमाळ्यातील माजी सामाजिक न्याय मंत्री स्व. दिगंबराव बागल (मामा) यांची जयंती साजरी करण्यात आली. या जयंतीच्या निमित्ताने स्व. दिगंबरराव बागल यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. या प्रसंगाचे औचित्य साधून स्व.दिगंबरराव बागल यांच्या कन्या रश्मी दीदी बागल-कोलते (भाजपा महिला आघाडी प्रदेशउपाध्यक्ष) यांची निवड सोलापूर जिल्हा परिषद गटनेते पदी झाल्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभ महाविद्यालयामध्ये संपन्न झाला. सत्कारास उत्तर देताना रश्मी बागल म्हणाल्या की. स्व.दिगंबरराव बागल यांची

कार्यपद्धती अवलंबून तालुक्यातील जनतेसाठी व विशेषतः महिलांसाठी मी कार्य करणार आहे व दिलेल्या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न करणार आहे. यावेळी विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. अध्यक्षीय भाषणामध्ये विलासराव घुमरे यांनी स्व. मामांबरोबर घालवलेल्या आठवणींना उजाळा दिला व मामांची कार्य करण्याची पद्धत आणि सामान्य जनतेमध्ये निर्माण केलेला विश्वास याचे स्मरण केले. याप्रसंगी करमाळा नगर परिषदेचे नूतन उपनगराध्यक्ष अतुल फंड यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.पी. माने, अत्रे विकास प्रतिष्ठानचे विश्वस्त गौरव कोलते,

करमाळा नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष अतुल फंड, करमाळा नगरपरिषदेचे नगरसेवक दिनेश घोलप, सुनील बनसोडे, अहिल्यानगर जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब साळुंखे, सेवानिवृत्त पोलीस उपअधिक्षक शेटे, ड्रीमवर्थ प्रोडॉक्शनचे चेअरमन सारिका पन्हाळकर, अर्चना कांबळे, प्रशासन अधिकारी संभाजी किर्दाक, कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद फंड सर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सुजाता भोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. विष्णू शिंदे यांनी केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *