
अंध कलाकारांना ब्लँकेट व जीवनावश्यक वस्तूंचे शंभुराजे जगताप यांचे हस्ते वाटप
करमाळा प्रतिनिधी
अंध कलाकारांना ब्लँकेट व जीवनावश्यक वस्तूंचे शंभुराजे जगताप यांचे हस्ते वाटप करण्यात आले आहे. करमाळा शहरामधे गेली काही दिवस काही अंध कलाकार गाण्याच्या माध्यमातून आपली कला सादर करीत उदरनिर्वाह करीत आहेत . त्यांच्या

सुश्राव्य अशा गायनकलेने मंत्रमुग्ध होत भाजपचे युवानेते शंभुराजे जगताप यांनी त्यांच्या कलेची कदर करत अंधत्वावर मात करून जगण्याची धडपड पाहीली व आपणही समाजाचे काही देणे लागतो या विधायक व उत्तरदायित्वाच्या भावनेने त्या कलाकारांना ब्लँकेट, गहू, तांदुळ आदी जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केले . याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष नारायण बापू

जगताप,बाजार समितीचे माजी उपसभापती दत्तात्रय अडसुळ, माजी नगरसेवक राजेंद्र ढेपे, बाजार समितीचे संचालक मयुर दोशी, बाजार समितीचे सचिव विठ्ठल क्षिरसागर, व्यापारी सतीश काकडे, प्रितम लुंकड, मनोज पितळे, राहुल सोरटे आदी उपस्थित होते .
