स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल २०२२-२३ स्नेहसंमेलन उत्साहाही वातावरणात संपन्न झाले

करमाळा प्रतिनिधी

स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल २०२२-२३ चे स्नेहसंमेलन करमाळा बस स्थानक समोरील विकी मंगल कार्यालयात  उत्साही  वातावरणात संपन्न झाले आहे

कार्यक्रमाचे उद्घाटन करमाळा पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांनी केले होते कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी  स्नेहालय स्कूलचे संस्थापक जयंत दळवी प्रमुख उपस्थिती गटविकास अधिकारी मनोज राउत,मा नगरसेवक डॉ श्रीराम परदेशी, यशकल्याणी सेवाभावी संस्था अध्यक्ष गणेश करे-पाटील,मा दुध संघाचे संचालक राजेंद्रसिंह भोसले, विद्दा विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे,पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे,मा नगरसेवक कमलाकर वीर,संचालक रामचंद्र दळवी,सागर दळवी आदीजण उपस्थित होते प्रथम प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सरस्वती,जिजाऊ,नेताजी सुभाषचंद्र बोस,सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले होते.त्यानंतर गणेशाच्या गीताने सुरुवात करण्यात आली होती तसेच छत्रपती शिवाजी महाराज,जिजाऊ,देश भक्ती गीते आणि विविध सिनेमातील गीतांवर भरदार नृत्य विद्यार्थ्यांनी केले होते.

यावेळी मार्गदर्शक/संचालक रामचंद्र दळवी , सौ. सुमन दळवी, द्रौपदि वाघमारे, मंजुळा वाघमारे,सुलोचना दळवी,उपस्थित होते.मकाईचे मा संचालक सुर्यकांत पाटील,नेते अरुण जगताप, मा.नारायण पवार,रोशेवाडी सरपंच यशपाल कांबळे,मेस्टा एफ संघटनेचे उपाध्यक्ष नितीन भोगे,स्वाती बिले,एलेजाबेत आसादे,मधुरा जगताप,ज्योती मुथा,ज्योती पांढरे,भावना गांधी, तसेच पालक विद्दार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

या कार्यक्रमाचे परिश्रम आयोजन मुख्याध्यापिका धनश्री जयंत दळवी, टीचर- सीमा कोरडे, हेमा शिंदे, शिवांगी कांबळे, कोमल बत्तीसे, पल्लवी माळवे, शुभांगी खळदकर,अंजुम कांबळे, फरहाणा खान, सविता पवार, रोहिणी गरड,श्रद्धा गांधी,कृष्णा पवार, राहुल पलंगे,बाबा तांबोळी,अंकुश माळी. यांनी केले होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थेच्या सचिव धनश्री दळवी यांनी केले होते मनोगत जोतीराम गुंजवटे, मनोज राउत, महेश चिवटे, गणेश करे पाटील,राजेंद्रसिंह राजेभोसले यांनी केले तर सूत्रसंचालन शेखर जोगळेकर यांनी तर आभार स्नेहालय स्कूलचे संस्थापक जयंत दळवी यांनी केले आहे.

…………………………….

शालेय विद्यार्थांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी स्नेहालय स्कूलने स्नेह संमेलनाचे आयोजन केले. ही चांगली गोष्ट आहे.भविष्यातही शिक्षणाबरोबर मैदानी खेळावरही अधिक भर विद्यार्थ्यांनी द्यावा.विद्यार्थी हे उद्याचे आपल्या देशाचे भवितव्य आहे.त्यांना माझ्याकडून शुभेच्या.- जोतीराम गुंजवटे पोलीस निरीक्षक करमाळा

………………………………

विद्यार्थ्यांनी चांगली तयारी केलेली दिसत आहे उत्साही वातावरण आहे. असेच उत्साही वातावरण विद्यार्थ्यांनी कायम स्वरूपी ठेवावे,ऐतिहासिक गाणी, तसेच देशभक्तीपर गीते, विविध नृत्य व संगीत हे विद्यार्थ्यांना चालना देणारे आहे.स्नेहालय परिवाराकडून शिक्षण तर मिळतेच परंतु आपण विद्यार्थी आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न भारत मातेच्या कार्यासाठी करत आहात हे सुंदर आहे – मनोज राऊत गटविकास अधिकारी करमाळा

………………………………

विद्यार्थी हे देश घडविणारी पिडी आहे. तंत्रज्ञानाचा जमाना आहे विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर संगनकीय ज्ञानही असायला पाहिजे यामुळे आमच्या यश कल्याणी परिवाराकडून खास स्नेहालय स्कूलच्या विद्यार्थांसाठी मध्यंतरी शालेय खेळणी दिली होती. आता L E D भेट देत आहोत. भविष्यातही आवश्यक ती शैक्षणिक मदत स्कूलला दिली जाईल.- गणेश करे पाटील,अध्यक्ष यश कल्याणी संस्था,करमाळा

……………………………….

आमचे मित्र पत्रकार बंधू जयंत दळवी हे आमच्या सारख्येच प्रतिकूल परिस्थितून आले आहेत आम्हा पत्रकार सर्व बंधूंना आनंद आहे आज त्याची स्नेहालय स्कूल ही संस्था मोठी होत आहे विविध कार्यक्रम आयोजन करून विद्दार्थी उत्तम दर्जेदार शिक्षण घेत आहे त्यांना माझ्या परिवाराकडून शुभेच्या संस्थेची अशीच प्रगती होवी – महेश चिवटे अध्यक्ष पत्रकार संघ     

……………………………….

काही दिवसापुर्वी आपल्या स्कूलला नर्सरी ते बारावी पर्यंत आर्ट,काँमर्स, सायन्स,इंग्लिश, सेमी इंग्लिश, सीबीएसई आदि सर्व शाखेची मान्यता मिळाली आहे आता विद्यार्थी पालकांना चिंता करायची गरज नाही सुसज्ज असे इमारतीचे बांधकाम चालू आहे पुणे शहरातील स्कूल प्रमाणे आपल्या येथेही उत्तम दर्जाचे शिक्षण मिळेल- जयंत दळवी संस्थापक अध्यक्ष स्नेहालय स्कूल, करमाळा

…………………………………

आपल्या स्कूल मध्ये सर्व विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात सहभागी होणे ही काळाची गरजेच आहे या संकल्पनेतून आम्ही विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाचे सादरीकरण करत आहोत मुले ही क्रिएटिव्ह असतात सध्या मोबाईल, सोशल मीडियाचा जमाना आहे अर्थात विज्ञानाचि मोठि देणगी आहे परंतु त्याच्या बरोबर उत्तम शिक्षण, मैदानी खेळ, संगीत नृत्याविष्कार सर्व हवे – धनश्री दळवी सचिव/ मुख्याध्यापिका स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल, करमाळा

…………………………………..

यश कल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील,मा नगरसेवक कमलाकर वीर यांच्या हस्ते स्नेहालय स्कूलला एल ए डी भेट देण्यात आला होता याचा स्वीकार स्कूलचे शिक्षकानी करताच विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या आवाजात उत्साही वातावरणात  करे पाटील यांचे आभार व्यक्त करण्यात आले होते      

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *