
करमाळा प्रतिनिधी
पोमलवाडी-केत्तूर व केत्तूर-१ ते केत्तूर-२ पुलाची कामे आमदार नारायण आबा पाटील यांनी मार्गी लावली त्याच धर्तीवर पोमलवाडी-चांडगाव पुलाला ३४० कोटी मंजूर…
आमदार नारायण आबा पाटील यांनी २०१४-२०१९ च्या कार्यकाळात पश्चिम भागात व पूर्ण मतदारसंघात रस्त्यांची कामे मार्गी लावली. अशक्य असलेली पोमलवाडी-केत्तूर व केत्तूर-२ ते केत्तूर-१ ही दोन्ही पुलांची कामे पूर्ण करुण दाखवली व जनतेचा खऱ्या अर्थाने विश्वास संपदान केला. या दोन पुलाची कामे तर मार्गी लावलीच परंतु पोमलवाडी-चांडगाव व ब्रिटिश कालीन असलेला डिकसळ पूल यासाठी जोरदार प्रयत्न चालू केले आणि आपल्या आमदारकीच्या शेवटच्या टप्प्यात पोमलवाडी-चांडगाव पुलाच्या कामाने (मंजुरीन) हुलकवणी दिली परंतु डिकसळ पुलाचा सर्वे व फाउंडेशन चेकिंगच काम चालू करण्यात आमदार नारायण आबा पाटील यांना यश आलं आणि याला पश्चिम भागातील सर्व सामान्य जनता साक्षीदार आहे.

पुढे झालेल्या २०१९ विधानसभा निवडणुकीत अगदी अल्पशा मताने नारायण आबा पाटील यांना अपयश आलं आणि खऱ्या अर्थान करमाळा विधानसभा मतदारसंघ २०१९-२०२४ या कार्यकाळात बराच मागे पडला ना लोकप्रतिनिधिंच मतदारसंघात लक्ष ना कोणती ठोस विकास कामे आणि जी भूमिपूजने केली ती आजही कागदावरच असून मतदारांची पूर्ण फसवणूक झाली. याचाच वचपा म्हणून पुन्हा २०२४ ला जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची निवडून मतदारांनी स्वतःच्या हातात घेतली व आमदार नारायण आबा पाटील यांना जवळपास अठरा हजार मताधिक्यान निवडून देऊन पुन्हा मतदारसंघातील रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी विधानसभेत पाठवलं.

२०२४ विधानसभा निवडणुकित आमदार नारायण आबा पाटील यांचा विजय होताच अगदी पहिल्या दिवसापासून मतदारसंघातील रखडलेली कामे की जी आपल्या वचननाम्यात जनतेला सांगितली होती त्यात प्रामुख्याने रिटेवाडी सिंचन योजना,कुकडी प्रकल्प,बेंद ओढा,पोमलवाडी-चांडगाव पूल,मतदारसंघातील रस्ते,लाईट यांचा पाठपुरावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस,उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे व संबंधित विभागांच्या मंत्री यांच्या मार्फत चालू ठेवला होता. येणाऱ्या अधिवेशनात यातील बऱ्याच कामांना यश मिळणार असून यातील काही कामे मार्गी लागणार आहेत.