
करमाळा प्रतिनिधी
करमाळा नगरपरिषद व अखिल भारतीय ग्राहक पंचायत, करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त सखी मेळावा महिलांसाठी विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी करमाळा शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने आपल्या कलागुणांना वाव देव्यासाठी सहभाग घेऊन आनंद द्विगुणित करावा.

दि. ९ मार्च २०२६ रोजी दुपारी १ ते ४ या वेळेत विकी मंगल कार्यालय येथे स्पर्धा क्र. १- संगीत खुर्ची, स्पर्धा क्र. २- बकेट मध्ये बॉल टाकणे.
दि. १० मार्च २०२६ रोजी दुपारी १ ते ४ या वेळेत विकी मंगल कार्यालय येथे स्पर्धा क्र. ३ पाककृती, स्पर्धा क्र. ४ उखाणे स्पर्धा
दि. ११ मार्च २०२६ रोजी दुपारी ३ ते ७ या वेळेत विकी मंगल कार्यालय येथे सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षिस वितरण.
प्रत्येक स्पर्धेमधून प्रथम तीन विजेते निवडण्यात येतील व विजेत्यांना आकर्षक बक्षिस देण्यात यईल. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागींना गिफ्ट देण्यात येईल.

या कार्यक्रमाचे आयोजन मुख्याधिकारी सचिन तपसे, नगराध्यक्षा मोहिनीताई सांवत, उपनगराध्यक्ष अतुल फंड, महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मलाताई गायकवाड, करमाळा नगरपरिषद व अखिल भारतीय ग्राहक पंचायत करमाळा यांनी केले आहे व यांनी नावनोंदणी करण्यास आवाहन केले आहे.
तुषार टांकसाळे मो.९९६०२३६५७१, अश्विनी जाधव मो. ७९७२८४७२०९, शितल बहाड मो.९१७२४२३३५१, सुप्रिया पालखे मो.७९७२६५०५०८ यांच्याकडे नाव नोंदणी करावी.