करमाळा प्रतिनिधी

सोमवार दि. 23 मार्च 2026 रोजी जंतर-मंतर दिल्ली येथे होणाऱ्या मातंग आक्रोश महामोर्चा साठी करमाळ्यातून शेकडो कार्यकर्ते जाणार आहेत अशी माहिती दलित महासंघाचे करमाळा तालुका अध्यक्ष दीपक आरणे यांनी दिली.

मातंग आक्रोश महामोर्चाचे आयोजन दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी केले आहे.

हा मोर्चा अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण (अ,ब,क,ड) साठी, सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न साठी, ॲट्रॉसिटी ॲक्ट सक्षम करण्यासाठी, बोगस अनुसूचित जातीचे दाखले घेऊन राजकीय फायदा घेणाऱ्या जातचोरांना जन्मठेपेच्या शिक्षासाठी महामोर्चा काढण्यात येत आहे. ‘एक वेळ जाती साठी’ असे या मोर्चाचे ब्रीदवाक्य आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *