करमाळा प्रतिनिधी

स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापिका धनश्री दळवी यांच्या हस्ते फुल अर्पण करण्यात आले.

मुख्याध्यापिका धनश्री दळवी यांनी बोलताना सांगितले की, मराठी ही आपली गोड मातृभाषा आहे. आईच्या अंगाईगीतापासून ते शाळेतील गोष्टीपर्यंत मराठी आपल्याला साथ देते. कविता, गाणी, अभंग आणि गोष्टींनी मराठी भाषा सुंदर झाली आहे. आपण सर्वांनी मराठीचे जतन करून अभिमानाने बोलणे हीच खरी सेवा आहे. असे मॅडमनी सांगितले. त्याचबरोबर भावेश गोदारा, आराध्या कांबळे, आदित्य झाडबुके, सम्राट कांबळे, ईश्वरी माकुडे, विघ्नेश साळुंखे, नोमन  बेग, कार्तिक चव्हाण, श्रावणी कांबळे, जैनब बेग या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व प्रि-प्रायमरी आणि पहिलीच्या विद्यार्थ्यांनी कविता सादर केल्या. मराठी भाषा दिनानिमित्त शाळेत हस्ताक्षर स्पर्धा, कविता वाचन, म्हणी, ओव्या घेण्यात आल्या. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *