महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा -गटविकास अधिकारी राऊत

करमाळा प्रतिनिधी

जिल्हा परिषद सोलापूर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी केले आहे. महाराष्ट्र महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पंचायत समिती करमाळा व शासन निर्णय क्रमांक मग्रारो 2021 प्र.क्र. 182 मग्रारो – १ दि.०४ नोव्हेंबर 2022 मधील प्राप्त मार्गदर्शक सूचनानुसार वैयक्तिक सिंचन विहीर कामासाठी ग्रामपंचायत मार्फत अर्ज प्राप्त करून मा. गटविकास अधिकारी, पंचायत समिती करमाळा यांचे मार्फत मंजुरी प्राप्त करून घेणेसाठी लाभधारक शेतकऱ्याकडून खालील प्रमाणे अर्ज मागविण्यात येत आहेत. वेळापत्रक विहित नमुन्यातील अर्ज ग्रामपंचायत कडे सादर करणे. दिनांक 25 /1/ 2023 पर्यंत,

ग्रामसभा आयोजन / प्राधान्य क्रम निश्चित करणे. दिनांक 26 /1/ 2023, पात्र लाभार्थी यादी ग्रामसभा ठराव व प्रस्तावासहित ग्रामपंचायत मार्फत पंचायत समिती करमाळा कडे सादर करणे दिनांक १/२/2023 ते 15/ 2/ 2023 पर्यंत. उपरोक्त वेळापत्रककानुसार सिंचन विहीर कामासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत असून, लाभार्थ्यांची पात्रता व इतर सविस्तर माहिती दिनांक 4 /11/ 2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार लाभार्थ्याने काळजीपूर्वक वाचूनच अर्ज सादर करणेबाबत यावा. लाभार्थ्याची पात्रता / अटी ७/१२ व उतारा व ६ ड  फेरफार आवश्यक, गटामध्ये विहीर /बोअर /विहिरीत हिस्सा/ जलसिंचन सुविधा नसावी. शासकीय पाणी पुरवठा विहीर श्रोतापासून 500 मीटर पेक्षा जास्त अंतरा आवश्यक,

लाभार्थ्याचा प्राधान्यक्रम:- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, निरोधिसुचित जमाती, दारिद्र्यरेषेखालील इतर कुटुंबे, स्त्री – कर्ता असलेली कुटुंबे, शारीरिक दृष्ट्या विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटुंबे, जमीन सुधारणेचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, सिमांत शेतकरी (2.5 एकर पर्यंत), अल्पभूधारक (५ एकर पर्यंत) वरील प्रमाणे पात्र लाभार्थ्याकडून विहित वेळेत ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज स्वीकारण्यात येतील. सिंचन विहीर मंजुरीचे अधिकार पंचायत समिती स्तरावर  मा.गट विकास अधिकारी यांचेकडे आहेत. सरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत यांचा सल्ला मसलत करावी असे सांगत राऊत अखेर म्हणाले  चार लाख रूपये लाभार्थी याला मिळेल असे त्यांनी सांगितले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *