करमाळा प्रातिनिधी

काव्य मित्र संस्था पुणे यांच्यामार्फत शिवजयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय शिक्षण सेवा पुरस्कार दिं. १९ रोजी पिंपरी चिंचवड येथील सायन्स पार्क येथे श्री संगमेश्वर विद्यालय संगोबाचे मुख्याध्यापक सुनील शिंदे सर यांना राष्ट्रीय शिक्षण सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सिंदखेडराजा येथील जिजाऊ जिजामाता यांच्या घराण्यातील सोळावे वंशज संभाजीराजे जाधवराव यांच्या हस्ते व संत साहित्याचे गाढे अभ्यासक बोत्रे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंद व कुंभारगावचे मुख्याध्यापक नानासाहेब आढाव सर तुमच्या अर्धांगिनी इ. उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *