जुना ब्रिटिश कालीन पूलाचा मोरीचा काही भाग कोसळला ही अतिशय दुर्दैवी घटना – मा सरपंच कोंढार चिंचोली देविदास साळुंके
करमाळा प्रतिनिधी
कोंढार चिंचोली ता करमाळा ते डिकसळ ता इंदापूर जुना ब्रिटिश कालीन पूलाच्या 8 नंबरच्या मोरीचा काही भाग कोसळला ही अतिशय दुर्दैवी घटना असे मा सरपंच कोंढार चिंचोली देविदास आप्पा साळुंके यांनी सांगितले आहे
या घटनेची हकीकत सांगताना या पुलास साधारण 150 वर्षाहून अधिक काळ झालेला आहे या पुलाचे स्ट्रॅक्चरलं ऑडिट सन 1989 साली झाले असून त्यात त्यांनी हा पूल जड वाहतूकसाढी बंद करणेकामी शासन दरबारीं तसेच सा.बां. खात्याचे उप अभियता पासून त्यांचे वरिष्ठ सर्व अधिकारी कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता, चीफ अभियंता, सचिव तसेच जिल्हाधिकारी, प्रांतधिकारी, तहसीलदार, पोलीस अधीक्षक, या सर्वाना लिहून कळिवले होते परंतु या गोष्टीकडे दुर्लक्ष केले शिवाय जड वाहतूक बंद करून हलकी वाहतूक चालू ठेवावि तसेच बयारिकेट्स तोडणारावर एफ. आय. आर. दाखल करा व संबंधित साखर कारखाने यांना लेखी पत्र देऊन त्यांची जड वाहतूक अन्य मार्गानी दाखवली आहे त्या मार्गानी, करणेकामी

देविदास आप्पा साळुंके मा सरपंच कोंढार चिंचोली यांनी वेळोवेळी सांगितले परंतु सा. बां. चे उबाळे साहेब, तेलंग साहेब यांनी दुर्लक्ष करून व साखर कारखाने यांना पाठीशी घालण्याचे काम केले त्यामुळंच पुलाची आज ही परस्थिती निर्माण झाली असल्याचे श्री साळुंके यांनी सांगितले व त्यासाठी संबंधित सा. बां. खात्याच्या अधिकारी यांना दोशी धरून त्यांचेवर कर्तव्यात कसूर केली म्हणून निलबनाची कारवाई करावी अशी मागणी शासनाकडे देविदास साळुंके यांनी केली आहे जड वहातुक कारणारावर वेळीच गुन्हा दाखल केला आसतातर पुलाची ही आवस्था होऊन सर्व सामान्य लोकांचे आता होणारे हाल हे झाले नसते असे साळुंके यांनी सांगितले व त्यांनी आता लोकांना दोन्ही हात जोडून लोकांना विनंती केली आहे कि आता तरी गर्डन तोडू नका व आपलेच भिगवणाला जाणे बंद करू नका अशी विनंतीच त्यांनी केली असून नवीन पर्यायी पुलाच्या साठी गट तट न पाहता शासनाकडून निधी साठी आपापल्या नेत्यांना वेठीस धरून काम करणेकामी सहकार्य करावे असे आवाहन देविदास साळुंके यांनी केले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *