करमाळा प्रतिनिधी

केम गणात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमरजित साळुंके यांना विजयी करण्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे आवाहन

प्रतिनिधी: केम गणातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची चुरस दिवसेंदिवस वाढत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अमरजित साळुंके यांनी प्रचारात ठोस आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे. मतदारांचा वाढता प्रतिसाद, कार्यकर्त्यांमधील उत्साह आणि सकारात्मक वातावरणामुळे केम गणातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर केम गणातील उमेदवार अमरजित साळुंके यांच्या प्रचारार्थ खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या कंदर व केम येथे कॉर्नर सभा संपन्न झाल्या. या सभांमध्ये त्यांनी केम गणाच्या विकासासाठी सुसंगत,पारदर्शक व लोकाभिमुख नेतृत्वाची गरज अधोरेखित केली.

खासदार मोहिते पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, केम गणाच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम, अभ्यासू आणि जनतेशी नाळ जोडणारे नेतृत्व आवश्यक आहे. अमरजित साळुंके हे असेच नेतृत्व असून केम गणाच्या विकासासाठी त्यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे त्यांनी आवाहन केले.

तसेच मोहिते पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, जे आता आमच्यापासून बाजूला झाले, त्यांना पुन्हा ” शिवरत्न ” वर स्थान नाही,असा ठाम संदेश देत विश्वासघातकी राजकारण चालणार नसल्याचा इशारा दिला. या कॉर्नर सभांना कार्यकर्ते व मतदार उस्फूर्तपणे उपस्थित होते. मोहिते पाटील यांच्या सभेनंतर मतदारांना आत्मविश्वास मिळाला असून केम गणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बाजू अधिक मजबूत होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

यानंतर खासदार मोहिते पाटील यांनी व्यापारी पेठेतील काही प्रमुख ठिकाणी भेट दिली.

यावेळी जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, आदिनाथ चे उपाध्यक्ष महेंद्र पाटील, डॉ.अमोल घाडगे, दादासाहेब पारखे, माजी सरपंच आजिनाथ शिंदे, काका पारखे, गोपाळदादा मंगवडे, नवनाथ बापू डोके, रावसाहेब जाधव, पोपटदादा साळुंके, हरिभाऊ गरड, शिवसेना (ठाकरे) अध्यक्षा वर्षाताई चव्हाण, प्रशांत वासकर, सावंत गुरुजी, किरण गोरख तळेकर, हरिभाऊ मंगवडे, अरुण तात्या यादव, लियाकत भाई, अकलाख जहागीरदार, सुभाष मंगवडे, वसंत साळुंके, दिलदार मुलानी, अरुण पवार, सर्जेराव फरतडे, सुनील पवार, ॲड.प्रशांत बागल, बाळासाहेब फरतडे, ज्ञानेश्वर पवार, रणजीत पवार, नागनाथ गाडे, राहुल पवार, अशोक मुटेकर, पिंटू भगत, रामेश्वर मेटे, मोहन गाडे, दारासिंग गाडे, विशाल गाडे आदींसह पंचक्रोशीतील मतदार बंधू आणि भगिनी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *