जेआरडी माझा

धनगर आरक्षणासाठी शिर्डीत एल्गार बैठक
सर्वांनी उपस्थित राहावे-सरवदे
महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या पृष्ठ क्रमांक ३६ वर समाविष्ट केलेले असताना राज्यातील तत्कालीन राज्यकर्त्यांनी धनगर समाजाला एसटी अनुसूचित जातीचे आरक्षणामुळे वंचित ठेवल्याचे पाप केलेले आहे धनगर समाज डोंगरदऱ्या, कडीकपाऱ्या मध्ये फिरून मेंढपाळ व्यवसाय करणारा समाज म्हणून ओळखला जातो या समाजाला संविधानिक न्याय मिळालेला असतानाही राज्यकर्त्यांनी मात्र धनगर समाजाला एसटी अनुसूचित आरक्षणापासून वंचित ठेवलेले आहे गेल्या ६५ वर्षापासून राज्यातील धनगर समाज आरक्षणाच्या आपल्या हक्काच्या मागणीसाठी संघर्ष करत आहे परंतु आता ही शेवटची लढाई असून संघर्ष योद्धा दीपक भाऊ बोराडे यांच्या माध्यमातून एक स्वाभिमानी नेतृत्व मिळालेले आहे त्यामुळे समाजाने आता त्यांच्या नेतृत्वात काम केले पाहिजे धनगर एसटी आरक्षण तेव्हा शक्य आहे सर्वजण एकत्र येऊन रस्त्यावरची आणि न्यायालयातील एकत्र लढाई लढू! अन्यथा सरकार कायमच हातावर तुरी देणार हे नक्की आहे म्हणून पुढील दिशा ठरविण्यासाठी त्याच्या अनुषंगाने धनगर जमातीच्या एसटी अनुसूचीत जमातीच्या आरक्षणाची पुढील दिशा ठरवण्यासाठी दिनांक ११ फेब्रुवारी बुधवार रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी एल्गार बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीला राज्यातील धनगर समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या माजी सरपंच सौ लक्ष्मी संजय सरवदे यांनी केले आहे.
