करमाळा प्रतिनिधी

करमाळा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 05/2026 भारतीय न्याय संहिता-2023 चे कलम 303(2) प्रमाणे दाखल गुन्ह्यामध्ये गेलेला मुद्देमाल त्या मध्ये 49 ग्रॅम 200 मी.ली. वजनाचे सोन्याचे गळ्यातील गंठण व 26 ग्रॅम वजनाचा चांदीचा छल्ला एकूण किंमत 820000 (आठ लाख वीस हजार रुपये) होती.

हे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी करमाळा यांचे आदेशान्वये आज रोजी फिर्यादी नामे सुलोचना मच्छिंद्र लोहार, राहणार डोंबिवली, गोग्रास वाडी, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे यांना परत दिला आहे. पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, पोलीस उपविभागीय अधिकारी अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या सहकार्याने मुद्देमाल देण्यात आला आहे. पोलीस काँन्स्टेबल संदीप कवडे, मनीष पवार, वैभव ठेंगल, पांडुरंग आर्किले, प्रसाद काटे, शितल न्हावकर, हनुमंत भराटे आदी कर्मचाऱ्यांनी आरोपी पकडुन मुद्देमाल हस्तगत केला होता.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *