करमाळा प्रतिनिधी

जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 चे अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी करमाळा यांचे आदेशान्वये वीट येथे व करमाळा येथे आठवडा बाजार असल्याने ग्रामीण भागातील मतदार मोठ्या संख्येने बाजारासाठी करमाळा येथे तालुक्यातील बहुसंख्य मतदार भाजीपाला किराणा घेण्यासाठी येतात त्यामुळे मतदारांना जनजागृती

करण्यासाठी तसेच शंभर टक्के मतदान करणे, प्रवृत्त करणे, महिलांची 100% मतदान टक्केवारी वाढवणे बाबत पंचायत समिती किरण सूर्यवंशी सीडीपीओ, नितीन कदम गटशिक्षणाधिकारी, मिनीनाथ टकले विस्तार अधिकारी, अशोक माने विषय साधन व्यक्ती, पर्यवेक्षिका वंदना चोले, करिष्मा देसले, भारती प्रचंड राव यांचे उपस्थितीत मतदारांना मतदान करणे बाबत मार्गदर्शन केले. मतदान जागृती करणे कामी मार्गदर्शन करण्यात आले. आठवडी बाजार असल्याने दुकानदार व्यापारी विक्रेते विविध स्टॉल येथे थांबून मतदारांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. वीट येथे सीमा चोपडे, विजया शिंदे, शशिकला जाधव, नंदा घाडगे, आशा पवार, नफीसा शेख, उज्वला भंडारे यांचे उपस्थितीत प्रभात फेरी काढण्यात आली. मोठ्या प्रमाणात बाजारात करणारे मतदार ग्रामस्थ यावेळी बाजारात माहिती सांगणारे पाहून समाधान व्यक्त करण्यात आले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *