करमाळा प्रतिनिधी

स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल शाळेचे स्नेहसंमेलन अविष्कार 25-2026 उत्साही वातावरणात संपन्न झाले आहे. करमाळा शहरातील तसेच ग्रामीण भागातील वाडी-वस्ती वरील सामान्य कुटुंबातील चिमुकले कलाकारांनी देशभक्ती, पारंपारिक गीते, लोकगीते, मराठी-हिंदी चित्रपट गीते यावर बहारदार नृत्याविष्कार सादर केला. यावेळी विद्यार्थ्यांना मेडल व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन करमाळा नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा मोहिनिताई सावंत यांच्या हस्ते झाले. प्रमुख उपस्थिती सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीजा मस्के, नगरसेविका ज्योत्सना लुनिया, डॉ. सावंत मँडम साहित्यिका अंजली श्रीवास्तव, स्नेहालय स्कूलचे संस्थापक अध्यक्ष जयंत दळवी, सचिव तथा मुख्याध्यापिका धनश्री दळवी, स्नेहालय स्कूलचे संचालक रामचंद्र दळवी, द्रौपती वाघमारे, सुमन दळवी, सुलोचना दळवी, प्रियांका गायकवाड उपस्थित होते.

यावेळी स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका धनश्री दळवी मँडम यांनी प्रास्ताविक केले तर नगराध्यक्षा मोहिनिताई सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीजा मस्के, नगरसेविका ज्योत्सना लुनिया, साहित्यिका अंजली श्रीवास्तव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्कूलच्या सहशिक्षिका शिवांगी कांबळे, अश्विनी पाटील, रोहीणी गरड, सुनंदा दुधे, आशा पाटणे, पूजा पाटील, आश्विनी झाडबुके, सविता पवार, कृष्णा पवार, आसिफ मणेरी सर्व टिचर्स कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारे पालक वर्ग श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाटणे मॅडम यांनी तर आभार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयंत दळवी यांनी मानले होते.

…………………

स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलच्या स्नेहसंमेलनात आपण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना ट्रॉफी तसेच मेडल देऊन त्यांचा गौरव केला तो कौतुकास्पद आहे. यामुळे विद्यार्थी आजुन क्रिडा स्पर्धा तसेच उत्तम असे शिक्षण घेण्यासाठी प्रयत्नशील राहतात – मोहिनीताई संजय सावंत, नगराध्यक्षा नगर परिषद करमाळा

…………..

स्नेहालय स्कूल मध्ये शैक्षणिक दर्जा वाढत आहे. उत्तम कार्य दळवी सर व दळवी मँडम करित आहे. आपण सर्व विद्यार्थी पालकांनी सतर्क राहणे सध्याच्या जमान्यात आवश्यक आहे. आपणास काही अडचणी असतील तर हवे ते सहकार्य करू – गिरीजा मस्के मँडम, सहाय्यक पोलीस निरीक्षक, करमाळा

…..

स्नेहालय स्कूल प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. यासाठी दळवी सर व दळवी मँडम प्रयत्न करीत आहे. गेले कित्येक वर्षे झाली मी स्कूलच्या विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्या संपर्कात आहे. यामुळे हे लक्षात येत आहे. असेच उत्तम व चांगल्या दर्जाचे शिक्षण आपण देऊन विद्यार्थी तर घडवत आहात ते घडले तर देश घडणार आहे – अंजली श्रीवास्तव, साहित्यिका करमाळा

……

स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलच्या नवीन इमारतीचे बांधकाम चालू आहे. लवकरच विद्यार्थ्यांसाठी डिजिटल, सुंदर अशा सुविधा, शहरातील शैक्षणिक पध्दती नुसार शिक्षण मिळणार आहे. उत्तम असे क्रिडांगण तयार होत आहे. शाळेमध्ये उत्कृष्ट दर्जाचे संगणक येणार आहेत. त्यामुळे साहजिकच शाळेतील विद्यार्थी आता संगणकाचे एआय पध्दतीने धडे घेणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी आणि अर्थातच राष्ट्राच्या उभारणीसाठी आपण सर्व पालक शिक्षक करत असलेल्या या पवित्र कार्यात नक्कीच प्रत्येकाने सहकार्य केले पाहिजे. आपल्या सर्वांचे सहकार्य आहे – धनश्री जयंत दळवी, मुख्याध्यापिका स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल, करमाळा

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *