करमाळा प्रतिनिधी
श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल कोर्टी, ता. करमाळा, जि. सोलापूर येथे सामाजिक कार्यकर्त्या व पोलीस मित्रपरिवार संघाच्या महाराष्ट्र राज्य महिला प्रमुख पद्मजाताई पोपटराव इंगवले-जगताप यांनी मंगळवार 13 जानेवारी रोजी होम मिनिस्टरचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी आयपीएस अंजना कृष्णा मॅडम, तहसीलदार शिल्पा ठोकडे मॅडम, एपीआय गिरीजा मस्के मॅडम, सरपंच भाग्यश्री मेहेर, वैराग येथील पेरक बहुजन संस्थेच्या भाग्यश्री घोडके या उपस्थित राहणार आहेत. तरी गावातील सर्व महिलांनी कार्यक्रमासाठी दुपारी 3 वा. उपस्थित राहावे. असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या पद्मजाताई इंगवले-जगताप यांनी केले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *