करमाळा प्रतिनिधी

कंदर केम सातोली या रस्त्याचे काम बांधकाम विभागाच्या वतीने सुरू केल्याने आबासाहेब साळुंखे यांनी आत्मदहन करण्याचा देण्यात आलेल्या इशाऱ्याला यश आले आहे. यामुळे केम सातोली कंदर गावातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला.

कंदर वरून  जाणाऱ्या सातोली व केम या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा 7 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता कंदर सातोली रोडवर आत्मदहन करण्याचा इशारा आबासाहेब साळुंखे यांनी दिला होता. त्यानुसार बांधकाम विभागाचे उप अभियंता ए डी पवार यांनी लेखी आश्वासन देऊन बुधवार रोजी सकाळी खड्डे बुजवण्याचे काम चालू केले. त्यामुळे कंदर केम व शिवणे सातोली येथील नागरिकांनी आनंद व्यक्त केला.

तसे तर हा रस्ता पूर्णपणे डांबरीकरण होणे गरजेचे आहे परंतु शासनाकडे हा प्रस्ताव देण्यात आला असल्याने यासाठी निधीची तरतूद होण्यासाठी थोडा विलंब लागत असल्याने तातडीने रोडवर पडलेले खड्डे बुजवण्याचे काम देखभाल दुरुस्ती अंतर्गत चालू केले आहे. असे आबासाहेब साळुंखे यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांनी या रस्त्याकडे गांभीर्याने पाहून तातडीने निधीची तरतूद शासन दरबारी करून घ्यावी अन्यथा भविष्यामध्ये तीव्र आंदोलन करावे लागेल असाही इशाराही त्यांनी दिला.

यावेळी मौलासाहेब मुलानी, अमर भांगे, नितीन साळुंखे, नारायण यादव, सुदर्शन साळुंखे, हरी चव्हाण, सातोली चे सरपंच  मनोहर कदम,  महेंद्र साळुंखे, राहुल पवार, अक्षय गलांडे, योगेश साळुंखे, ज्ञानेश्वर लोकरे, दत्तात्रय साळुंखे, रवींद्र काका गरड, दादासाहेब फरतडे, विवेक यादव, संतोष यादव, ज्योतीराम सरडे, गौरव साळुंखे, आदिजन उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *