करमाळा प्रतिनिधी

करमाळा ते जामखेड आळजापूर पर्यंत आसलेला मार्गस्थ रस्ताची अत्यंत दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर प्रचंड मोठ-मोठी खड्डे पडल्यामुळे रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. या रस्त्यावर अनेक टू व्हीलर गाड्या घसरून पडलेल्या आहेत तर आनेक फोर व्हीलर ते एसटी बसेस चे पाटे तुटून गाड्या बंद पडलेल्या आहेत. याला जबाबदार संबंध सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारीच आहेत. या रस्त्याची दुरावस्था पाहून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पवार यांना फोनवरती म्हणाले की, करमाळा-जामखेड रस्ता हा महाराष्ट्रात आहे की पाकिस्तान मध्ये आहे अद्यापर्यंत या रस्त्याचे खड्डे का बुजवले नाहीत, त्या रस्त्यावरती अनेक एक्सीडेंट झालेले आहेत. आता देखील एक टू व्हीलर गाडी पडून एका बाईला मुक्कामार लागला याला जबाबदार कोण असे अनेक सवाल पवार यांना राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते यांनी विचारले. त्या संदर्भात पवार म्हणाले की, आजच्या आजच जामखेड-करमाळा रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यात येती.ल आजच ठेकेदाराला बोलावून काम करण्याचे आश्वासन दिले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *