कंदर येथील रस्ते व नागरी सुविधांसाठी युवा नेते दिग्विजय बागल यांच्या प्रयत्नातून ५४ लाख रुपये निधी मंजुर – रंगनाथ शिंदे
प्रतिनिधी | करमाळा
कंदर (ता. करमाळा) गाव व परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी ५४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. भाजपाच्या प्रदेश महिला उपाध्यक्षा रश्मी बागल व युवा नेते दिग्विजय बागल यांच्या विशेष प्रयत्नातून हा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रंगनाथ शिंदे यांनी दिली.
शिंदे म्हणाले की, करमाळा तालुक्याच्या दीर्घकालीन विकासाच्या दृष्टीने भाजपाच्या माध्यमातून विविध गावांमध्ये पायाभूत सुविधा बळकट करण्यावर भर देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कंदर गाव व परिसरातील नागरिकांनी सुचवलेल्या विकासकामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
या निधीतून ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात भुयारी गटार बांधणे, सिमेंट काँक्रीट रस्ते, विद्युतीकरण, सिमेंट पोल स्थलांतर, तसेच वजन काटा ते सोमनाथ जाधव वस्ती, जिल्हा परिषद शाळा माने वस्ती ते रवी माने घर, सावंत घर ते भारत पराडे घर, आणि श्रीराम मंदिर परिसरातील सिमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. मंजूर विकासकामे लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, ज्योतिर्लिंग मंदिर येथे नवीन काँक्रीट रस्त्याचे काम पूर्ण झाले असून मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कामही सध्या प्रगतीपथावर आहे. उर्वरित विकासकामांसाठी दुसऱ्या टप्प्यात अधिक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन युवा नेते दिग्विजय बागल यांनी दिल्याचेही शिंदे यांनी नमूद केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *