
कुर्डुवाडी प्रतिनिधी
कुर्डूवाडी शहर नाभिक दुकानदार संघटनेच्या वतीने आज गांधी चौक येथील महात्मा फुले शॉपिंग सेंटर येथे हुतात्मा वीर भाई कोतवाल यांचा स्मरण दिन साजरा करण्यात आला.
हुतात्मा वीर भाई कोतवाल यांच्या विषयी बोलताना सुधीर भाऊ गाडेकर यांनी थोडक्यात इतिहास सांगितला. हुतात्मा वीर भाई कोतवाल (विठ्ठल लक्ष्मण कोतवाल) हे एक भारतीय क्रांतिकारक, समाजसुधारक आणि स्वातंत्र्यसेनानी होते. त्यांचा जन्म १ डिसेंबर १९१२ रोजी माथेरान येथे झाला आणि २ जानेवारी १९४३ रोजी त्यांनी देशासाठी बलिदान दिले; त्यांनी ‘कोतवाल दस्ता’ नावाचा गुप्त गट स्थापन केला, ज्याने ब्रिटिश सत्तेला आव्हान दिले आणि ‘करेंगे या मरेंगे’ आंदोलनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, विशेषतः मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या टॉवर्सना लक्ष्य केले, ज्यामुळे ब्रिटिश सरकारला त्यांच्यावर २५०० रुपयांचे बक्षीस ठेवावे लागले. ब्रिटिशांच्या विरुद्ध समांतर सरकार चालवणारे वीरभाई कोतवाल हे होते.

अशा या हुतात्म्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी वसंत चौधरी, भगवान दळवी, बाळासाहेब गाडेकर, रामदास राऊत, सागर राऊत, पोपट गाडेकर, ईश्वर गाडेकर,अक्षय राऊत, सुधीर गाडेकर, भैय्या राऊत आदी समाज बांधव या वेळी उपस्थित होते.