
करमाळा प्रतिनिधी
पांडे जिल्हा परिषद गटातून राणी संतोष वारे यांनी निवडणूकीसाठी उभा राहावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
त्यांचे पती संतोष वारे यांचा राजकीय संपर्क दांडगा आहे.
देशाचे नेते शरदचंद्र पवार, खा. सुप्रिया सुळे, मा. उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खा. धैर्यशील मोहिते पाटील यांचे मार्गदर्शन व आ. नारायण पाटील यांचे सहकार्य आहे. राणी वारे यांनी मागील जिल्हा परिषद सदस्य म्हणून खुप कामे केली आहे. संतोष वारे यांना शेतकरी, सामान्य माणूस, कोणीही असेल त्यांचा फोन आल्यावर ते तहसील, पोलीस स्टेशन, पंचायत समिती, कृषी कार्यालयातील कामे करण्यासाठी वारे तात्काळ हजर राहुन सोडवत आहेत. त्याच भागातील इच्छुक गटातील

काही नेते मंडळी निवडणूकीसाठी तयारी करत आहे, ते काणाचा फोनही उचलत नाही, त्यांचा नागरीकांशी संपर्कही नाही, त्यांनी उभे राहु नये असे पांडे गटातील ग्रामस्थ बोलत आहेत. वारेंचा शेतकरी राजकीय व सामाजिक क्षेत्रात दांडगा संपर्क आहे. अजात शत्रु म्हणून त्यांची ओळख आहे. राणी वारे या पांडे परिसरात सामाजिक कार्यकर्त्या म्हणून प्रसिद्ध आहेत. महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी तसेच तालुक्यातील गावातील विविध सामाजिक कार्यक्रमात अग्रसेर असतात. वारे यांनीच पांडे जिल्हा परिषद गटातुन उभा राहावे असे ग्रामस्थांकडून मागणी होत आहे. म्हणून वारे यांच्या नावाची चर्चा आहे.