करमाळा प्रतिनिधी

सोलापूर जिल्हा स्काऊट गाईड यांचे वतीने चारे येथील जिल्हा मेळाव्यात आदर्श केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी पुरस्कार कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा शिक्षणाधिकारी कादर शेख, डायट प्राचार्य नदाफ सर, प्राचार्य हनुमंत चव्हाण, तहसीलदार गणेश जगदाळे, बार्शी गटशिक्षण अधिकारी बालाजी नाटके, पंढरपूर गटशिक्षण अधिकारी गजानन लिंगाडे, स्काऊट गाईड जिल्हा समन्वयक श्रीधर मोरे, शिरसट मॅडम उपस्थित होते. करमाळा तालुका पंचायत समिती शिक्षण विभागाचे स्काऊट गाईड कब बुलबुल पथक नोंदणी १०० टक्के केल्या बद्दल झरे – केंद्रप्रमुख अमृत सोनवणे, जातेगाव – केंद्रप्रमुख रमाकांत गटकळ, चिखलठाण – केंद्रप्रमुख वंदना पांडव, जिंती – केंद्रप्रमुख महावीर गोरे, कंदर – केंद्रप्रमुख साईनाथ देवकर, केत्तूर – केंद्रप्रमुख विकास काळे यांना आपल्या केंद्रातील सर्व शाळांची स्काऊट गाईड व कब बुलबुल पथकांची १०० टक्के नोंदणी केल्याबद्दल व कोर्टी बीटचे विस्तार अधिकारी प्रभावती जगताप यांना आदर्श विस्तार अधिकारी म्हणून जिल्हा शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी बार्शी येथील जिल्हा मेळाव्यात आदर्श केंद्रप्रमुख व आदर्श विस्तार अधिकारी म्हणून जिल्हास्तरीय पुरस्कार देवून गौरविण्यात आले. यावेळी पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी नितीन कदम, विस्तार अधिकारी मिनिनाथ टकले, जयवंत नलवडे, तालुका समन्वयक संतोष पोतदार यांनी अभिनंदन केले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *