कुगांव येथे दिग्विजय बागल यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप

करमाळा तालुक्याचे युवा नेते , तरुणांच्या गळ्यातील ताईत, श्री. मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सन्माननीय दिग्विजयजी भैय्या बागल यांच्या 32 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने कुगांव नगरीचे सुपुत्र तथा आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. श्री. धनंजय जी (दादा) डोंगरे यांच्या शुभहस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुगांव येथे अनावश्यक खर्चाला फाटा देत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. याप्रसंगी मा.श्री. महादेवजी कामटे (करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक व विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे विद्यमान चेअरमन), कुगांव नगरीचे विद्यमान सरपंच कौशल्यताई लक्ष्मण कामटे, उपसरपंच मन्सूर जी भैय्या सय्यद, माजी उपसरपंच मा.श्री. इन्नुसजी भाई सय्यद, मा.श्री.कैलासजी आप्पा बोंद्रे, ग्रामपंचायत विद्यमान सदस्य adv. मा. श्री विजय जी कोकरे, मा. श्री. उद्धवजी गावडे , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.श्री.महादेवजी अवघडे, उपाध्यक्ष मा. श्री.कृष्णाजी सुळ, जगदंब दूध डेरी चेअरमन मा. श्री.सचिनजी गावडे, मा.श्री.नवनाथ (तात्या शेठ )अवघडे ,कुगांव गावचे पोलीस पाटील जालिंदर हराळे, सागर पोरे ,केरायण हवालदार, प्रगतशील बागातदार मा.श्री.संदीपान कामटे,कुगांव नगरीचे सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.अतुल मारकड- पाटील,शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य मा.श्री.परबत कामटे, सचिन पोरे, आबा कामटे, जैनुद्दीन शेख, , कुगांव शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. सय्यद सर , उपशिक्षक मारकड सर ,येवले सर व पंचक्रोशीतील ग्रामस्थ या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *