करमाळा प्रतिनिधी

जिल्हा परिषद शिक्षण विभाग सोलापूरच्या वतीने आयोजित माढा येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धेच्या लहान गटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरवाडी ता. करमाळा शाळेची विद्यार्थिनी किंजल मिलिंद कांबळे हिने जिल्ह्यातून तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

तिच्या या यशाबद्दल करमाळा तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी कदम, विस्तार अधिकारी टकले, जातेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख गटकळ, शाळेचे मुख्याध्यापक देशमाने सर व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब पवार, हिवरवाडीच्या सरपंच वैशाली इरकर यांनी किंजल चे तोंड भरून कौतुक केले आहे.

तिच्या या यशामध्ये वर्गशिक्षिका दिपाली गायकवाड मॅडम, नितीन व्हटकर सर, नाना वारे सर व पाटूळे मॅडम या सर्वांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.

स्पर्धेच्या ठिकाणी जि.प. सोलापूर मुख्यालयाच्या विस्ताराधिकारी स्वामी मॅडम, तालुक्याचे गटशिक्षणअधिकारी विकास यादव, विस्तार अधिकारी अजावडेरे सर, इत्यादी मान्यवरांनी अभिनंदन करून तिला विजयी ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *