जिल्हास्तरीय खोखो स्पर्धेत वीटच्या मुलींची बाजी
दिनांक 10 जानेवारी रोजी मोहोळ येथे झालेल्या जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत जिल्हा परिषद केंद्र शाळा वीट शाळेच्या मुलीच्या संघाने जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला व दक्षिण सोलापूर वर रोममहार्षक विजय मिळवला.
दरवर्षी सोलापूर जिल्ह्यामध्ये खोखो कबड्डी वैयक्तिक, लंगडी आशा स्पर्धा जिल्हा परिषद अंतर्गत घेतल्या जातात या स्पर्धेमध्ये तालुक्यातून लहान मुलीचा गट जिल्हा परिषद केंद्र शाळा वीट या संघाने विजय मिळवला होता त्या अनुषंगाने हा संघ दिनांक 10 जानेवारी 2023 रोजी मोहोळ येथे झालेल्या खो-खो स्पर्धेमध्ये तीन संघाला नमून अंतिम फेरीत प्रवेश केला, व अंतिम सामन्याची लढत दक्षिण सोलापूर तालुक्याबरोबर लागली या सामन्यामध्ये वीट संघाने दक्षिण सोलापूर या संघावर अतिशय चित्त थरारक व रोमहार्षक दोन गुणांनी विजय मिळवून करमाळा तालुक्याला व वीट गावाला एक नंबरचे प्रथम

पारितोषिक या संघाने मिळून दिले, या संघामध्ये कुमारी, सृष्टी जगदाळे अमृता ढेरे आसावरी जाधव प्रतीक्षा कांबळे आर्या काळे प्राची मारकड शुभ्रा ढेरे सौंदर्य ढेरे अमृता भिसले, अन्वी जाधव, श्रेया ढेरे व प्रीतम इरले, या मुलींनी या संघात सहभाग घेतला होता. दोन महिने कसून सराव करून हा संघ जिल्हा परिषद केंद्र शाळा वीटचे शिक्षक श्री चंद्रहास चोरमले (केंद्रप्रमुख) यांनी यावर्षी संघ तयार केला;अथक मेहनत घेतली व पहिल्याच प्रयत्नामध्ये जिल्ह्याची ट्राफि करमाळा तालुका व वीट गावाला मिळवून दिली.या संघाला तयार करण्यासाठी श्री गोरख ढेरे सर,श्री बरडे सर, श्री जाधव सर, विनोद ढेरे सर हे सर्व शिक्षक छत्रपती शिवाजी विद्यालय वीट व भाऊसाहेब गायकवाड सर जिल्हा परिषद शाळा पोंधवडी या सर्वांचे सहकार्यामुळे व अथक प्रयत्नामुळे ह्या ट्रॉफीवर आपण करमाळा तालुका व वीट चे नाव
झळकु शकलो, या सर्व संघासाठी शाळेतील सर्व शिक्षक व मुख्याध्यापक यांचे सहकार्य लाभले.
शनिवारी सकाळी ठीक 9 वाजता वीट मध्ये विजयी संघाची डी जे आणि हलगीच्या निनादत मिरवणूक निघणार आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *