
मकाई कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून, कार्यकर्त्याकडून उत्स्फूर्तपणे सत्काराचा कार्यक्रम संपन्न
कमलाई नगरी
श्री मकाई साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांनी व बागल गटाच्या नेत्या रश्मीदिदी बागल यांनी प्रथम स्व दिगंबरराव बागल यांच्या मांगी येथील स्मृती स्थळावर जाऊन दर्शन घेतले होते. त्यांनंतर श्री कमलाभवानी मंदिर येथे जाऊन कमलाईचे दर्शन घेतले होते.
दत्त मंदिर विकास नगर करमाळा येथे बागल गटाच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होत.
या रक्तदान शिबिरात बागल प्रेमी युवक कार्यकर्त्यांनी उस्फूर्तपणे सहभागी होऊन 55 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराचे उद्घघाटन बागल गटाच्या नेत्या रश्मी दिदी बागल युवा नेते दिग्विजय बागल यांच्या हस्ते करण्यात आले या रक्तदान शिबिराला मान्यवरांनी भेट देऊन रक्तदान केले तसेच आपल्या लाडक्या युवा नेत्याचा शाल श्रीफळ मानाचा फेटा बांधून सत्कार केला. याप्रसंगी आदिनाथ कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरे, बाजार समितीचे सभापती शिवाजीराव बंडगर, उपसभापती चिंतामणी दादा जगताप,नगरसेवक अल्ताफ तांबोळी, आदीनाथचे संचालक नानासाहेब लोकरे,रघुवीर जाधव,

मकाईचे संचालक रामभाऊ हाके,आशिष गायकवाड,अमोल झाकणे,देवा ढेरे, कार्यकारी संचालक हरिचंद्र खाटमोडे,प्रताप बरडे सर, तात्यासाहेब काळे पाटील, शौकत नालबंद, संतोष देशमुख, अनंतकुमार ढेरे, रंगनाथ शिंदे,सरस्वती केकाण, शरद मामा भोसले, अॅड. श्रीराम गलांडे, दत्ता गायकवाड, अजित बप्पा झांजुर्णे, शशिकला शिर्के, बापू उकले,संध्या जगताप, रुपाली लष्करे, प्रशासन अधिकारी बनसोडे साहेब, दिनेश भांडवलकर धनंजय झिंजाडे,नगरसेवक शौकत नालबंद,,जयकुमार कांबळे, ज्योतीराम लावंड मेजर मा. सरपंच विष्णू रंदवे ॲड दत्तात्रय सोनवणे, सचिन बापू पिसाळ, सौदागर दौंड ,दत्ता निंबाळकर अनिल पवार विकास रोकडे भैरू कदम जांलिधर रोडगे संदीप खटके,महेश तळेकर,कुलदिप पाटील,रणजीत शिंदे रेवण निकत याच्यांसह मान्यवर उपस्थित होते. या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या रक्तदात्यास दिग्विजय बागल यांचा फोटो असलेला जर्किंग भेट देण्यात आला यशस्वीपणे पार पाडण्यासाठी बागल गट यांच्यावतीने धनंजय ढेरे रविभाऊ शेळके मित्रपरिवार यांनी परिश्रम घेतले.

