
अमेरिकेच्या जागतिक विमा परिषदेच्या सदस्य पदी सौ.शामल पंडित यांची निवड
विमा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल एम डी आर टी चा पुरस्कार देऊन सन्मानित
उरळीकांचन येथील सौ शामल संतोष पंडित यांना विमा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पहिल्याच वर्षी

जागतिक विमा परिषदेकडून एमडीआरटी पुरस्कार मिळालेला आहे. अमेरिकेमध्ये होणाऱ्या जागतिक विमा परिषदेला उपस्थित राहण्याची संधी सौ शामल संतोष पंडित यांना मिळाली आहे. सौ शामल पंडित यांनी एलआयसीच्या विविध स्पर्धेमध्ये भाग घेऊन केलेल्या पॉलिसीच्या संख्येवर ते केवडिया गुजरात, गोवा या ठिकाणी होणाऱ्या एलआयसीच्या

मीटिंगसाठी पात्र झाले आहेत. तसेच एका दिवसात पंचवीस पॉलिसी करून ते डिव्हिजन व ब्रांच मध्ये पैठणी साडी साठी पात्र झालेले पहिले एजंट आहेत.
विमा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे भारतीय आयुर्विमा महामंडळ 952 शाखेचे वरिष्ठ व्यवस्थापक मुकुंद भाईक ,शाखा व्यवस्थापक अभिमन्यू सिंग , विशेष मार्गदर्शक विकास अधिकारी दिनेश कासवेद आदींनी सौ.शामल पंडित व त्यांचे पती संतोष पंडित यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत .तसेच शामल पंडित या करमाळा तालुक्यातील मांगी येथील पृथ्वीराज क्षीरसागर यांच्या कन्या आहेत.
