
आदिनाथ कारखान्यात निर्माण पहिल्या उत्पादित साखरेतून!!!
आदिनाथ महाराजाला महाप्रसादाचा भंडारा!!!
बचाव समितीने संकल्प पूर्ती निमित्ताने केलाआनंद उत्सव साजरा
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे
आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत
या दोघांचे बचाव समितीने मानले आभार!!
करमाळा( प्रतिनिधी)
आदिनाथ सहकारी साखर कारखाना बारामतीच्या तावडीतून सोडून तो पुन्हा करमाळा तालुक्यातील सभासदांच्या मालकीचा व्हावा या मागणीसाठी आदिनाथ बचाव समितीची पहिली बैठक आदिनाथ महाराजांच्या मंदिरात संगोबा येथे झाली होती
यावेळी आदिनाथ चे माजी कार्यकारी संचालक हरिदास दास डांगे यांनी आदिनाथ कारखाना सभासदांच्या मालकीच्या राहिल्यानंतर उत्पादित झालेल्या पहिल्या साखरेचा नैवेद्य आदिनाथ महाराजाला असा संकल्प सोडला होता
याप्रमाणे आज संकल्प पूर्ती करण्यात आली

यावेळी बचाव समितीचे निमंत्रक तथा साहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश (दादा) चिवटे आदिनाथ चे माजी संचालक
डॉक्टर वसंत पुंडे
संतोष पाटील
राजा शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्षअण्णासाहेब सुपनवर
हरी दादा झानपुरे
बाबुराव नेटके
शारंगधर खाडे सर
मिसाळ मेजर
राजाराम डांगे
माणिक बोंबाळे
बाबा साबळे महाराज ज्योतीराम डांगे संतोष निर्मळ मुख्याध्यापक सुनील शिंदे सर पत्रकार राजेंद्र गायकवाड नागेश शेंडगे विनय ननवरे आधी जण आदिनाथ बचाव समितीचे सभासदउपस्थित होते
आदिनाथ साखर कारखान्यातून निर्माण झालेल्या पहिल्या साखरेच्या पोत्यातून आदिनाथ महाराजांच्या मंदिरात शिरा बनवून महाप्रसाद म्हणून उपस्थित सर्वांना वाटण्यात आला

_
तुमच्या पुतण्यापासून आमचा आदिनाथ वाचवा अशी आर्त हाक या आदिनाथच्या मंदिरातूनच माजी कृषिमंत्री शरद पवार यांना बचाव समितीने घातली होती तसेच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या डिजिटल पुढे अजब तुझे उद्धवा सरकार घोषणापत्र देऊन आदिनाथ कडे शरद पवार उद्धव ठाकरे यांचं लक्ष विधीत करण्याचा प्रयत्न आदिनाथ महाराजांच्या मंदिरातील बैठकीत झाला होता
____
हरिदास डांगे
कार्यकारी संचालक आदिनाथ कारखाना
आदिनाथ कारखाना बचाव समितीने प्रचंड असा संघर्ष करून हा कारखाना सभासदांच्या मालकीचा ठेवण्यात यश मिळवले आहे आरोग्य मंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत यांनी मनाचा मोठा पणा करून बारा कोटी रुपयांची आर्थिक मदत कारखान्याला केली हा कारखाना सुरू करण्यात प्राध्यापक तानाजीराव सावंत व प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांचा सिंहाचा वाटा असून या सावंत बंधू यांच्यामुळे कारखाना वाचला असा दावा केला

आदिनाथ कारखाना प्रतिदिन चार हजार मीटर क्षमतेने चालू शकतो अशा पद्धतीचे दुरुस्तीचे काम झाले आहे आता शेतकऱ्यांनी विश्वास ठेवून आदिनाथ ला मोठ्या प्रमाणावर ऊस घालावा यावर्षी चांगले गाळप झाले तर येणाऱ्या काळात कारखान्याचे विस्तारीकरण व इथेनॉल प्रकल्प वीज निर्मिती हे तिन्ही प्रकल्प खाती घेता येऊ शकणार आहे आदिनाथ चा येणारा काळ उज्वल असून हा सभासदांच्या मालकीचा कारखाना असल्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले