
रोपमल्लखांब स्पर्धेत घवघवीत यश राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
कमलाई नगरी
महात्मा गांधी विद्यालय करमाळा विद्यालयातील खेळाडूंचेविभाग स्तरीय रोपमल्लखांब स्पर्धेत घवघवीत यश राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड : विभाग स्तरीय रोपमल्लखांब स्पर्धा कंदर येथील कण्वमुणी प्रशाला याठिकाणी 3/01/2023 रोजी पार पडली. त्याठिकाणी पुणे विभागातील प्रत्येक जिल्ह्यातील विजेता संघ सहभागी झाला होता. त्या विभाग स्तरीय स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालय करमाळा येथील 17 वर्षे वयोगटात कु. साक्षी ईश्वर खुळे इयत्ता 8 अ या विद्यार्थिनीने चौथा क्रमांक प्राप्त केला. तसेच 19 वर्षे वयोगटात कु. संयुक्ता सोनके इयत्ता 10 अ मध्ये शिकत असलेली विद्यार्थिनीने विभाग

स्तरीय स्पर्धेत दुसरा क्रमांक प्राप्त केला. या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे .संस्थेचे चेअरमन मा. आ. श्री जयवंतराव जगताप साहेब, संस्थेचे विश्वस्त मा. नगराध्यक्ष श्री वैभवराजे जगताप, संस्थेचे विश्वस्त श्री शंभूराजे जगताप , संस्थेचे मुख्याध्यापक श्री कापले सर, उप मुख्याध्यापक श्री बागवान सर, जेष्ठ पर्यवेक्षक श्री शिंदे सर, पर्यवेक्षक श्री पाटील

सर, संस्थेचे सचिव श्री तरकसे सर, यांनी गुलाब पुष्प देऊन विजयी खेळाडूचे अभिनंदन केले. तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे श्री पवार सर, क्रीडा शिक्षक श्री दळवे सर यांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. तसेच शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर

कर्मचारी यांनी खेळाडूंचे विशेष अभिनंदन केले. या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
