
सन 2023 मध्ये सरासरी पेक्षा जास्त पाऊस
पंजाबराव डख
करमाळा प्रतिनिधी
जून 2023 पासून संपूर्ण वर्षभर मुबलक पाऊस किंबहुना सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडणार आहे यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याची पावसाची चिंता न करता जास्तीत जास्त क्षेत्र लागवडीखाली आणण्यासाठी प्रयत्न करावेत असे आव्हान ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब राव डक यांनी व्यक्त केले
करमाळा येथील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते फार्म ॲग्री सोल्युशन च्या वतीने भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या वेळेसाठी जवळपास दीड हजार शेतकरी उपस्थित होते
करमाळा तालुका आता केळी उत्पादनासाठी हभ होत असून यावर्षी करमाळा तालुक्यात जवळपास बारा हजार एकर क्षेत्रावर केली पिकाची लागवड झाली आहे येणाऱ्या काळात ऊस मोडून केळी लावण्याचा कल वाढत आहे

सर्व पार्श्वभूमीवर केळी उत्पादकांचा मेळावा घेण्यात आला यावेळी बोलताना डक म्हणाले की केळीही नाजूक पीक असून त्याला पाहिजे त्यावेळेस पाहिजे तेवढेच पाणी मिळाले पाहिजे अशा पावसाचा कमी जास्त पणा झाला तर केळी पिकाला धोका होऊ शकतो यावर्षी मात्र मुबलक पाऊस व सातत्याने पडणार आहे यामुळे केळी पिकाला पाणी देताना हवामानाचा अंदाज घेऊनच पाणी दिले पाहिजे
यावर्षी जमिनीतील पाण्याची पातळी वाढली असून यावर्षी पाणी कुठेतरी पडणार नाही असा दावा यांनी केला
फार्मसन कंपनीचे चेअरमन शेवाळे करमाळा तालुका खते बीबी आणि असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे केळीच्या उत्पादनावर भाष्य केले

सध्याच्या केळीरोपे विक्रीमध्ये प्रचंड काळा काळाबाजार सुरू असून याकडे कृषी खात्याने लक्ष द्यावे अशी तक्रार अनेक शेतकऱ्यांनी केली
फार्मसन ऍग्रो सोल्युशन ही कंपनी देशातील अठरा राज्यात आपली उत्पादन विकत आहे विदेशातील या कंपनीचे उत्पादने निर्यात होतात केळी पिकाला सक्षम करण्यासाठी या कंपनीची 12 उत्पादने बाजारात असून त्या उत्पादनाचा वापर केल्यानंतर केळी सुदृढ होऊन निर्यात करण्यासाठी योग्य अशा केळीचे उत्पादन मिळणार असा दावा कंपनीने केला
या कंपनीच्या कॉल सेंटरला फोन केल्यानंतर कंपनीचा अधिकारी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पीक पाहणी करून आलेल्या रोगावर कोणता उपचार करायचे याची माहिती मोफत देत असल्याची माहिती कंपनीचे मार्केटिंग अधिकारी श्री भरवटे यांनी दिली
