
प्रतापसिंह मोहिते पाटील महाविद्यालयाची मशाल फेरी…….
दिनांक ८ जानेवारी, प्रतापसिंह मोहिते पाटील महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष श्रम संस्कार शिबिराचे आयोजन हे मौजे साडे येथे दिनांक ५ जानेवारी पासून करण्यात आले असून त्याद्वारे ग्राम स्वच्छता, वृक्षारोपण, अंधश्रद्धा निर्मूलन, महिला सक्षमीकरण यासारखे उपक्रम राबविण्यात आले. त्यामध्ये संस्थेच्या चेअरपर्सन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर च्या सिनेट व व्यवस्थापन परिषद सदस्या आदरणीय पद्मजादेवी मोहिते पाटील व राष्ट्रीय काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या संकल्पनेतून काल पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मशाल फेरी चे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी सेंद्रिय शेती, गट शेती व विषमुक्त शेती संदर्भात ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात आली. यामध्ये पाणी फाउंडेशन चे प्रतीक गुरव, आशिष लाड, प्रणय, तसेच साडे चे मयूर पाटील, दत्तात्रय जाधव, कालिदास ढवळे, रेगुडे, आडेकर सर आदी मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर महाविद्यालयतर्फे कार्यक्रम अधिकारी प्रा. सोमनाथ जाधव, प्रा. अमोल गायकवाड व प्रभारी प्राचार्य डॉ देशमुख हे उपस्थित होते.



