
जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पिंपळवाडी येथे 45 लाख रुपये निधी मंजूर .
माजी उपसरपंच बापू काळे यांची माहिती…
प्रतिनिधी
करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे यांचे सूचनेनुसार जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पिंपळवाडी येथे पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी 45 लाख रुपये मंजूर झाले असल्याची माहिती पिंपळवाडी गावचे माजी उपसरपंच बापू काळे यांनी दिली. याविषयी अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, पिंपळवाडी गावाला उन्हाळ्यामध्ये तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते .ग्रामस्थांची ही मागणी लक्षात घेऊन आमदार संजय मामा शिंदे यांच्याकडे आम्ही पाणीपुरवठा योजना विषयी मागणी केली . त्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद देऊन पिंपळवाडी गावासाठी 45 लाख रुपये असा भरीव निधी मंजूर केल्यामुळे पिंपळवाडी गावचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मिटेल अशी आशा आहे.
चौकट –
आमदार निधि मधुन म्हसोबा मंदिर समोर संभामंडप 7 लाख, महादेव मंदिर समोर संभामंडप 7 लाख रुपयाचा निधी आमदार संजयमामा शिंदे यांचे सूचनेनुसार मंजूर झालेला आहे. त्यामुळे आमदार शिंदे यांचे पिंपळवाडी ग्रामस्थ कायम ऋणी आहेत.


