करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्याला वरदायिनी ठरणाऱ्या रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या मंजुरी संदर्भात मंत्री स्तरावर बैठकीचे आयोजन करण्यात येऊन ही योजना तात्काळ मार्गी लावण्यात यावी अशी मागणी श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक सतीश निळ यांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करमाळा येथे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी आयोजित बैठकीत केली आहे.

यावेळी महीला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी दिदी बागल व जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी यासंदर्भात आम्ही प्रयत्नशील असून लवकरच अशी बैठक लावण्यात येईल अशी ग्वाही दिली आहे. यावेळी बोलताना नीळ म्हणाले की, आमच्या नेत्या रश्मी दिदी बागल यांनी ज्यावेळी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला त्यावेळी रिटेवाडी उपसा सिंचन योजना मार्गी लावण्याची एकमेव मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे केली होती याची आठवण करून देऊन या योजने संदर्भात मंत्री स्तरावर तातडीने बैठक आयोजित करून ही योजना मार्गे लावण्यात यावी अशी मागणी या बैठकीत केली आहे. यावेळी करमाळा तालुक्यातील विविध भागातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *