वाशिंबे प्रतिनिधी

भाजपाचे जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य गणेश भाऊ चिवटे यांच्या हस्ते वाशिंबे परिसरातील विविध विकासकामांचे भव्य भूमिपूजन व लोकार्पण सोहळा रविवार, दि. ०२ नोव्हेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.

या सोहळ्यात ग्रामपंचायत वाशिंबे अंतर्गत एकूण सुमारे ३९ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण झाले असून, या सर्व कामांमुळे गावाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळणार आहे.

कामांची माहिती पुढीलप्रमाणे —

१️⃣ भैरवनाथ मंदिर ऑल कंपाऊंड व पेव्हर ब्लॉक बसवणे — ७ लाख रुपये (कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८:३० वा.)

२️⃣ दलित वस्ती गावठाण गार्डन पेव्हर ब्लॉक बसवणे — ७ लाख रुपये

३️⃣ दलित वस्ती गायकवाड वस्ती येथे स्ट्रीट लाईट दिवे बसवणे — ७ लाख रुपये

४️⃣ सोगाव-वाशिंबे शिवरस्ता मुरुमीकरण करणे — ३ लाख रुपये

५️⃣ समशानभूमी दुरुस्ती व पेव्हर ब्लॉक बसवणे — ५ लाख रुपये

६️⃣ पवार वस्ती येथे भगीरथ डीपी बसविणे — १० लाख रुपये

या सर्व विकासकामांमुळे वाशिंबे गावाच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा होणार असून, ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनातही सोय व सुविधा वाढतील.

कार्यक्रमाचे आयोजन सरपंच तानाजी बापू झोळ, मा.उपसरपंच अमोल पवार यांनी केले होते. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव, भाजपा तालुका अध्यक्ष काकासाहेब सरडे, मा.सरपंच प्रताप झोळ उपस्थित होते.

या प्रसंगी गणेशभाऊ चिवटे गावातील नागरिकांशी संवाद साधून पुढील काळातील विकास कामासंदर्भात चर्चा केली. पुढील काळात पालकमंत्री जयकुमार गोरे, मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, मा.आमदार संजयमामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिंबे गावाला विकास निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही दिली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *