
करमाळा प्रतिनिधी
शिवसेनेचे माजी शहर प्रमुख राजाभाऊ काळे यांचे पुतणे अक्षय ईश्वर काळे यांनी एमपीएससीच्या 2024 च्या निकालात 100 वा रँक प्राप्त करत सेल टॅक्स सहाय्यक आयुक्त (Class 1) पद मिळवले. त्याचे हे सलग सहावे पद आहे. दोन वेळा ASO मंत्रालय, दोन वेळा STI, एक वेळा STI सहाय्यक आयुक्त, एक वेळा BDO गटविकास अधिकारी. सध्या ते BDO या पदावर कार्यरत आहेत.
त्याच्या या यशाबद्दल त्यांचे विठ्ठल आप्पा सावंत, राहुल सावंत, संजय सावंत, सुनील सावंत यांनी अभिनंदन केले आहे व सर्वत्र कौतुक व अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
त्यांच्या या यशाबद्दल शिवसेनेचे माजी शहर प्रमुख राजाभाऊ काळे यांनी फटाके वाजून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला आहे.
