करमाळा प्रतिनिधी

मा.आमदार संजय मामा शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये निष्ठावंतांना संधी द्यावी. केतुर पंचायत समिती गणातुन टाकळीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व मा.तंटामुक्ती अध्यक्ष सागर आण्णा गोडसे किंवा त्रिमूर्ती विद्यालयाचे खजिनदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. गोरख नाना गुळवे यांना व कोर्टी जिल्हा परिषद गटातुन टाकळीच्या मा. सरपंच व त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालयाच्या सहशिक्षिका वर्षा गोरख गुळवे यांना संधी द्यावी. मा. आमदार संजय मामा शिंदे यांच्या बरोबर 2014 पासुन आजपर्यंत एक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. संजयमामा शिंदे यांच्या जिल्हा परिषद अध्यक्ष व

आमदार असताना टाकळी गावासाठी जवळपास 4 कोटीची विकासकामे करत गावातील सर्व घटकांना सामावून घेत विकास कामे केली आहेत. त्यांनी अखंडपणे संजय मामा शिंदे यांना साथ दिलेली असुन आजपर्यंत त्यांनी कुठल्याही पदाची उमेदवारीची मागणी केली नाही तरी संजय मामा शिंदे यांनी कट्टर समर्थकांना उमेदवारी देऊन न्याय द्यावा ही विनंती टाकळीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सागर आण्णा गोडसे केली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *