केम, जेऊरसह जिंती, पारेवाडी रेल्वे स्थानकावरील प्रश्न तातडीने मार्गी लावा- खासदार. रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांचे उपस्थितीत आमदार. संजयमामा शिंदे यांनी आग्रही मागणी केली आहे. केम रेल्वे स्थानकावरील कार्यक्रमात खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांचेसह आमदार. संजयमामा शिंदे आणि ज्येष्ठ नेते माजी आमदार. जयवंतराव( भाऊ) जगताप, माजी आमदार. नारायण पाटील.. रेल्वे चे अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी खासदार. रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार. संजयमामा शिंदे यांची भाषणे झाली.. रेल्वे बरोबरच करमाळा तालुक्यातील अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प,रस्ते, वीज, पाणी या करीता आम्ही एकमेकांचा समन्वय ठेऊन काम करीत असुन विकास हाच केंद्रबिंदु मानुन कार्यरत असलेचे सांगितले. यावेळी केम रेल्वे स्थानका प्रमाणेच जिंती, भगतवाडी, गुलमरवाडी, पारेवाडी, वाशिंबे, जेऊर रेल्वे स्थानकावर राहीलेले सिव्हील चे कामासह इतर कामे तातडीने मार्गी लावावीत तसेच, पारेवाडी रेल्वे स्टेशन वरील प्रवाशांचे मागणीचा विचार करून एक्सप्रेस गाड्यांना थांबा द्यावा या बाबतचे पत्रही खासदार. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना देण्यात आले. पारेवाडी रेल्वे स्थानकावर गाडीला थांबा देणेबाबत मी निश्चित प्रयत्नशिल राहील असे आश्वासनही खासदार निंबाळकर यांनी दिले आहे.