ऊस उत्पादक शेतकर्यांच्या, कामगारांची प्रपंचाची राख रांगोळी बागल यांनी केली शंभुराजे जगताप : – तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्यांच्या, कामगारांची प्रपंचाची राख रांगोळी करून रश्मी बागल यांनी आता अन्य कारखान्यांचे चिटबॉय हाताशी धरत आहे असे परखड व स्पष्ट मत जगताप गट व भाजपाचे युवानेते शंभुराजे जगताप यांनी व्यक्त केले आहे . या विषयी जगताप यांनी स्टिंग आँपरेशन करीत रश्मी बागल व अंबालिकाचे चिट बॉय शिंदे यांचा व्हॉट्सअप मेसेज संदेश पुराव्यानिशी समोर आणला आहे .यात अत्यंत खालच्या पातळीवरील हिणकस राजकारणाचे प्रदर्शन होत असून’ जयवंतराव जगताप यांचा ऊस नेला नाही व नेवू नका हेच अपेक्षित होते’ असा मेसेज आहे . यासह अन्य ही मेसेजेस आहेत त्यातून बरीच पोलखोल झाली आहे . बागल यांच्या या प्रवृत्ती मुळेच आदिनाथ व मकाईचे वाटोळे होवून हजारो ऊस उत्पादक सभासद, कामगार यांचे प्रपंच देशोधडीला लावल्याचे जगताप म्हणाले . जगताप गटाने गेली ३ पिढ्या तालुक्यात राजकारण समाजकारण करताना

विविध संस्था उभारल्या मोठ्या केल्या, मोडून खाल्ल्या नाहीत अथवा हिसकावून घेतल्या नाहीत . आकस वृत्तीने लोकांचे प्रपंच उठविले नाहीत, हजारो प्रपंच उभा करण्याचे पुण्य आमच्या पूर्वजांनी केले . याउलट बागलांचा राजकीय जन्मच जयवंतराव जगताप यांनी केला, रश्मी बागल यांना जीवदान दिले या सर्व बाबी विसरत त्यांनी राजकीय सुडबुद्धीने, कुरघोडीने आम्हाला खोट्या केसेसच्या माध्यमातून त्रास दिल्या, बहिणीच्या लग्नात अडथळे आणले . या सर्वांचा परीणाम म्हणून जनतेने त्यांना नाकारले तरीदेखील त्यांच्या रक्तातला दुर्गुण त्यांना स्वस्थ बसू देत नाही . आदिनाथ, मकाई बंद पाडले तरअंबालिका सारख्या कारखान्याच्या चिटबॉयला हाताशी धरण ऊस उत्पादकांची अडवणुकीचे धोरण चालूच आहे .

आमच्यासारख्या ऊस उत्पादकांची हि अवस्था? तर सर्वसामान्यांचे काय ?याचे उत्तर त्यांना जनताच येत्या कारखान्याच्या निवडणुकीत दाखवून देणार आहे . कारण प्रचंड हालअपेष्टा बागलांच्या कुकर्मामुळे तालुक्यातील ऊस उत्पादकाची झालेली आहे . तालुक्यातील उसाच्या जोरावर पवार, शिंदे, सावंत यांचे कारखाने जारात चालतात, दरही देतात, मग आदिनाथ मकाईची ही दुर्दशा का? असा सवालही जगताप यांनी केला .भविष्यात आणरवी बरीच सत्यता पुराव्यानिशी पुढे आणणार असल्याचेही जगताप यांनी सांगीतले .

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *