ओबीसी संघर्ष समिती सर्व निवडणुका लढविणार ,शुक्रवारी बैठक – विनोद महानवर
करमाळा प्रतिनिधी
ओबीसी संघर्ष समिती नगर परिषद, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूका लढविणार आहे अशी माहिती ओबीसी नेते तथा भाजपा जिल्हा चिटणीस विनोद महानवर यांनी दिली आहे.यावेळी भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अण्णासाहेब सुपनर उपस्थित होते.
ओबीसी नेते छगनराव भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली मा मंत्री धनंजय मुंडे, मंत्री पंकजाताई मुंडे,आ गोपिचंद पडळकर,प्रा लक्ष्मण हाके ,मा कल्याण दळे, प्रा नवनाथ वाघमारे, अँड मंगेश ससाणे यांच्या आदेशानुसार करमाळा नगर परिषद व जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लढविणार आहे यासंदर्भात शुक्रवार दिं 31 रोजी सकाळी 11 वाजता जुने पंचायत समिती विश्राम गृह येथे बैठक होणार आहे.तरी या बैठकीला सर्व ओबीसी समाज बांधव व इच्छुक उमेदवारांनी उपस्थित राहावे असे आवाहन ओबीसी नेते तथा भाजपा जिल्हा चिटणीस विनोद महानवर यांनी केले आहे
