
करमाळा प्रतिनिधी
श्री ज्ञानेश्वर वाचन मंदिर मुक्तद्वार वाचनालय करमाळा येथे आज डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये दिवाळी अंक, सार्थ ज्ञानेश्वरी ग्रंथ इत्यादींचे पूजन करण्यात आले. उत्कृष्ट वाचक व वर्तमानपत्र विक्रेते यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस माजी नगराध्यक्ष अमोदशेठ संचेती यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, दैनंदिन घडामोडी वर्तमानपत्रातून जनतेसमोर येत असल्या तरी, वर्तमानपत्र विक्रेत्यामुळेच पहाटेच्या वेळी वर्तमानपत्र वाचकांच्या हाती पडते. वाचन प्रेरणा दिवस साजरा करणे या कार्यक्रमाचे औचित्य साधून ज्ञानेश्वर वाचन मंदिर येथील उत्कृष्ट वाचक राजेश आसाराम धोत्रे यांचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव विठ्ठल क्षीरसागर यांच्या हस्ते श्रीफळ, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. वर्तमानपत्र विक्रेते सुनील सूर्यपुजारी यांचा सन्मान अमोदशेठ संचेती यांच्या हस्ते श्रीफळ, शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.

सदर कार्यक्रम प्रसंगी चिंटू कांबळे, शशांक भोसले, हिंदुराव जगताप, विठ्ठल क्षीरसागर, संजय घोरपडे, अमोद शेठ संचेती, फारुक भाई जमादार, बाळनाथ क्षिरसागर, विश्वास पाटील, बद्रीनाथ गायकवाड, कांतीलाल टेके, प्रशांत खारगे, संकल्प शहाणे, आबा नागटिळक, अभय देशपांडे, सतीश भिसे, गजानन राक्षे, सचिन घाटुळे, सुनील सूर्यपुजारी, अशोक मोरे, दत्तात्रय घोलप, प्रदीप चौकटे आणि वाचन मंदिराचे सभासद वाचक, विद्यार्थी, विद्यार्थिनी इत्यादी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय घोरपडे यांनी केले आणि प्रदीप चौकटे यांनी आभार मानले.